शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हिरडव शिवारात एकाचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 15:31 IST

गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

लोणार: तालुक्यात गेल्या १५ दिवसात मद्याच्या कारणावरून तीन जणांचे खून झाल्याच्या घटना ताज्या असतानाच तालुक्यातील हिरडव शिवारात गळफास घेतलेल्या अवस्थेत एकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. १९ सप्टेंबर रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.दरम्यान, या प्रकरणी लोणार पोलिसानी घटनास्थळी पंचनामा केला असून आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे गळफास घेतलेल्या स्थितीत हा मृतदेह आढळून आला असला तरी मृत व्यक्तीचे कुजलेले पार्थिव खाली पडलेले होते तर डोके तेवढे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे मृतदोची नेमकी ओळख पटविण्याचे आव्हान पोलिस प्रशासनासमोर आहे.लोणार तालुक्यात सप्टेंबर महिन्यात नातवाने मद्याच्या पैशासाठी आजीचा विळ््याचे वार करून खून केला होता. या घटनेनंतर हिरडव येथील एकाने मद्याच्या व्यसनातून पत्नीचा साडीच्या पदराने गळा आवळून खून केल्याची घटना चार सप्टेंबर रोजी उघडकीस आली होती. या दोन्ही घटनानंतर १७ सप्टेंबर रोजी मद्यपी वडिलांचा मुलानेच मारहाण करीत तथा गळाआवळून खून केल्याचे समोर आले होते. प्रकरणी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आलेले असून लोणार पोलिस घटनेचा पुढील तपास करीत आहेत.त्यातच १९ सप्टेंबर रोजी हिरडव-पळसखेड शिवारात जगन सोनुने यांच्या शेतात एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत एका अनोळखी व्यक्तीचे डोके आढळून आले तर त्याचे पार्थिव झाडाखालीच कुजलेल्या स्थितीत आढळून आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसली तरी त्यादृष्टीने पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती.त्यामुळे या प्रकरणात नेमके काय काय बाहेर येते याकडे सध्या लक्ष लागून आहे. १९ सप्टेंबरला हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित शेतकºयाने गावातील पोलिस पाटील यांना त्याची कल्पना दिली. पोलिस पाटील यांनी लोणार पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी