शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

जाहीर केलेली नुकसानभरपाई तुटपुंजी - रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 01:08 IST

खामगाव: गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या नुकसानाची भरपाई म्हणून सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून, आम्हाला ती मान्य नाही. गहू, हरभरा, कांदा उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी किमान ५0 हजार रुपये, तर फळबागांना हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत द्या अन्यथा गारपीटग्रस्तांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला.

ठळक मुद्देगहू,हरभरा, कांदा पिकाला हेक्टरी ५0 हजार रुपये मदतीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या नुकसानाची भरपाई म्हणून सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून, आम्हाला ती मान्य नाही. गहू, हरभरा, कांदा उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी किमान ५0 हजार रुपये, तर फळबागांना हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत द्या अन्यथा गारपीटग्रस्तांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला.गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाईचा योग्य मोबदला द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात संग्रामपूर पंचायत समितीवर भव्य मोर्चा शनिवारी दुपारी काढला. यावेळी ते बोलत होते.  रविकांत तुपकर यांनी बैलगाडी मोर्चाचे नेतृत्व केले. यापुढे सरकारच्या चुकीच्या धोरणावर तुपकर यांनी कडाडून टीका केली. एकीकडे माल्ल्या हजारो कोटींचा डल्ला मारून परदेशात पळून गेला. आता नीरव मोदीने आमच्या बँकावर डाका टाकून तोही फरार झाला. शेतकरी मात्र हजार-दोन हजार रुपयांच्या मदतीसाठी सरकारपुढे हात पसरवत आहे. काय चाललंय या देशात, ‘सब का साथ, सबका विकास’ म्हणणार्‍या मोदीने कोणाचा विकास केला? असा सवाल उपस्थित करून देश विकायला काढणार्‍या या सरकारला आता घरी पाठविण्यासाठी शेतकर्‍यांनो सज्ज व्हा, असे आवाहन तुपकर यांनी केले.      बोंडअळीच्या अनुदानाचे काय झाले? सोयाबीनने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले. आता पुन्हा नैसर्गिक आपत्तीने शेतकरी कोलमडून पडला. गारपिटीने शेतकर्‍यांचा गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष ही पिके उद्ध्वस्त झाली. त्यामुळे या अस्मानी आणि सुलतानी संकटात शेतकरी सापडला असताना त्याला मदतीचा हात देण्याऐवजी सरकार आता वीमा कंपन्यांकडे बोट दाखवत आहे. अनेक शेतकर्‍यांना विमा भरता आला नाही. मग अशा शेतकर्‍यांना तुम्ही वार्‍यावर सोडणार काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दुसरीकडे नुकसानग्रस्तांचे पंचनामे करताना प्रशासन दुजाभाव करीत आहे. गावपुढारी पटवार्‍यांना हाताशी धरून आपल्या जवळच्या लोकांचे पंचनामे करून घेत आहे. त्यामुळे सामान्य शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे. ही हुकूमशाही वेळीच बंद न झाल्यास व सर्वांना समान न्याय न मिळाल्यास अधिकार्‍यांना झोडपून काढा, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.  या मोर्चामध्ये स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, मोहन पाटील, उज्ज्वल चोपडे, रोषण देशमुख, संतोष दाने, विलास तराळे,  ज्ञानेश्‍वर हागे सहभागी झाले होते. 

तोंड पाहून पंचनामे करू नका!शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करा, तोंड पाहून पंचनामे करणे बंद करा व ज्यांचे खरेच नुकसान झाले त्यांना मदत द्या अन्यथा शेतकरी हातात रुम्हणे घेऊन ठोकून काढतील, असा सूचक इशाराही तुपकर यांनी दिला.

 

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाkhamgaonखामगाव