शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
2
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
4
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
5
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
6
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
7
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
8
‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
9
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
10
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
11
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
12
सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास
13
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
14
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
15
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
16
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
17
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
18
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
19
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
20
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली

कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 2:01 PM

या कर्जमुक्ती योजनेमध्ये पीक कर्जाव्यतीरिक्त शेतीसंलग्न अन्य कर्ज माफ नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

- ब्रह्मानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये केवळ पीक कर्जाचा समावेश असून शेतीसंलग्न कर्जाचा यात समावेश नाही. मात्र शेतकरी कर्जमुक्तीमध्ये शेतीसंलग्न कर्जाचाही समावेश असल्याचा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बँकामध्ये जाऊन चौकशी करत आहेत. यातून बँक व्यवस्थापन आणि शेतकºयांमध्ये काही वादाचेही प्रसंग जिल्ह्यात उद्भवत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘कर्जमाफी’ ऐवजी ‘कर्जमुक्ती’ असा शब्द प्रयोग आघाडी सरकारने योजनेच्या नावात केलेला आहे. त्यानुषंगाने प्रत्यक्ष शेतकºयांना कर्जमुक्त करण्यासाठी शेतीसंलग्न कर्जाच्या संदर्भातही भूमिका घेणे गरजेचे ठरत आहे. गेल्या काही वर्षापासून सततच्या दुष्काळामुळे शेतकºयांवर कर्जाचा डोंगर वाढतच गेला. शेतीतील उत्पादनात झालेली घट पाहता, शेतकºयांना कर्जफेड करणे अशक्य झाले. परिणामी शेतकरी आत्महत्यांचा आलेखही वाढत गेला. कर्जदार शेतकºयांना आधार देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या आघाडी सरकारने १ एप्रिल २०१५ पासून ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत व्याजासह मुद्दल असलेले २ लाख रुपये पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात या योजनेची कामे सुरू झाली आहेत. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून जिल्ह्यात २ लाख ९४० लाभार्थी शेतकºयांना १४०० कोटी रुपये त्यांच्या थेट कर्ज खात्यात जमा होणार आहेत. यामुळे शेतकºयांवरील कर्जाचे ओझे निश्चितच उतरणार असल्याचे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे नेतेमंडळी सध्या प्रत्येक भाषणात आवर्जून सांगत आहेत. परंतू या कर्जमुक्ती योजनेमध्ये केवळ पीक कर्जदार शेतकरीच पात्र ठरत आहेत. शेतकºयांवर पीक कर्जाबरोबरच विहिर, शेतजमीनी सपाटीकरण, हरितगृह, शेडनेट, पाईपलाईन यासारख्या शेतीसंलग्न कामाचेही बँकाचे कर्ज आहे.जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी बँकांकडून मध्यम किंवा दीर्घ मुदतीचे शेती कर्ज घेतलेले आहे. परंतू या कर्जमुक्ती योजनेमध्ये पीक कर्जाव्यतीरिक्त शेतीसंलग्न अन्य कर्ज माफ नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पीक कर्जाबरोबरच शेतीसंलग्न कर्ज माफ झाल्यास शेतकरी खºया अर्थाने कर्जमुक्त होईल, अशा प्रतिक्रिया काही शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलून दाखवल्या. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.बँक स्तरावर माहिती अपडेट करणे सुरू कर्जमुक्ती योजनेच्या अनुषंगाने सध्या बँक स्तरावर १ ते २८ नमुना असलेला फॉर्म भरण्याचे काम सुरू आहे. हे काम सध्या अंतीम टप्प्यात आहे. १ फेब्रुवारीपासून कर्जमुक्ती योजनेतील शेतकºयांची माहिती संबंधीत पोर्टलवर दिल्या जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी