शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
2
आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण
3
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
4
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
5
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
6
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
7
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
8
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
9
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
10
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
11
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
12
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
13
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
14
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
15
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
16
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
17
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
18
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
19
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
20
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'

दोन कामगारांचा मृत्यू; खामगावातील मस्तान चौकात शोकाकूल वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:58 PM

दोन कामगारांचा मृत्यू झाला  तर दोघे जखमी झाले. या घटनेमुळे शोकाकूल झालेल्या मुस्लीम बांधवांनी मस्तान चौक परिसरात बंद पाळला. 

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : वेल्डींग करत असताना आॅईल टँकचा स्फोट होवून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याच्या दुदैवी घटना ११ जूनरोजी येथील दुर्गाशक्ती फुड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत संध्याकाळी ६.३० वाजता घडली होती. यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला  तर दोघे जखमी झाले. या घटनेमुळे शोकाकूल झालेल्या मुस्लीम बांधवांनी मस्तान चौक परिसरात बंद पाळला. खामगाव येथील भैय्यूजी महाराज ऋषीसंकूल परिसरात दुुर्गाशक्ती फुडस प्रायव्हेट लिमीटेड कंपनीत आॅईल टँकचा स्फोट होवून त्यामध्ये शेख इसरार उर्फ सलमान शेख अबरार (२८) व शौकत कॉलनीतील शेख मुशिर शेख हनिफ (३०)  यांचा मृत्यू झाला. तर फरदीन खान, शेख अमिर हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुदैवी घटनेमुळे मस्तान चौकात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे. १२ जूनरोजी सकाळपासूनच मस्तान चौकातील एकही दुकान उघडले नाही. व्यापाºयांनी स्वत:हून बंद पाडला. 

पोलिस अधिक्षकांनी घेतली भेट घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी खामगाव येथे भेट दिली. मध्यरात्री त्यांनी मुस्लीम समाजातील नेत्यांसोबत बैठक घेवून शांततेचे आवाहन केले. 

 

टॅग्स :khamgaonखामगावAccidentअपघात