शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

राणीच्या बागेतील दीड वर्षाच्या बिबट्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 21:59 IST

राणीच्या बागेमध्ये ठेवण्यात आलेल्या दीड वर्षाच्या बिबट्याचा ३१ मे रोजी मृत्यू झाला.

बुलडाणा: येथील राणीच्या बागेमध्ये ठेवण्यात आलेल्या दीड वर्षाच्या बिबट्याचा ३१ मे रोजी मृत्यू झाला. दरम्यान विषाणूजन्य आजार, उष्माघात आणि प्रचंड ट्रेसमध्ये असलेल्या या बिबट्याचा अवघ्या काही दिवसातच मृत्यू झाल्याने संशय व्यक्त होत आहे. त्यातच मृत बिबट्या हा शेड्यूल एक मधील प्राणी असल्याने दोन दिवसापूर्वी मृत्यू पावलेल्या या प्राण्याची माहिती बाहेर न आल्यामुळे याबाबत तर्कवितर्क व्यक्त होत आहे. खामगाव तालुक्यातील अंत्रज शिवारामध्ये आजारी अवस्थेत काही दिवसापूर्वी हा बिबट्या सापडला होता.त्याला तेथून वनविभागाने रेस्कूय करू बुलडाणा येथील राणीच्या बागेत ठेवले होते. या बागेलगतच जिल्हा उपवनसंरक्षक संजय माळी व त्यांचे कार्यालय आहे. बागेतील लोखंडी पिंजऱ्यात या बिबट्याला ठेवण्यात आले होते. आधीच विषाणूजन्य आजाराने ग्रस्त असलेल्या या बिबट्याची उपासमार तथा उष्माघात आणि आजारपणामुळे आलेल्या ट्रेस यामुळे हा बिबट्या दगावला असावा अशी शक्यता पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातील डॉ. व्ही. आर. मोरे यांनी दिली. या मृत बिबट्याचे शवविच्छेदन त्यांनी केले होते. मात्र बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाच्या वर्तुळा बाहेर येण्यास जवळपास दोन दिवस लागले. त्यामुळे या विषयी तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे. त्यामुळे या बिबट्याचा मृत्यू हलगर्जीपणामुळे तर झाला नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे.विषाणूजन्य आजार, ट्रेस व उष्माघातामुळे या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा कयास आहे.व्ही. आर. मोरे, डॉक्टर, पशुसंवर्धन विभाग, बुलडाणादोन दिवसापूर्वी बिबट्याचा मृत्यू झाला आहे. अंत्रज शिवारातून त्यास आणण्यात आले होते. तो आजारी होता.(संजय माळी, जिल्हा उपवन संरक्षक, बुलडाणा)