खामगाव येथे त्यागमहर्षी दाधिच ऋषी जयंती साजरी केल्यानंतर दायमा दाधिच महासभेचे माजी अध्यक्ष कैलाश व्यास व जुगलकिशोर मुखिया यांच्या अध्यक्षतेत जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यामध्ये चिखलीचे युवा उद्योजक सुजित दायमा यांची जिल्हाध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली आहे. सुजित दायमा हे साई इव्हेन्ट कंपनीचे संस्थापक, तसेच राष्ट्रीय ब्राह्मण महासभेचे प्रदेशाध्यक्ष व शिवशक्ती सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्षदेखील आहेत. दायमा परिवार आणि ठाकूर रामकृष्ण परमहंस सेवा प्रतिष्ठान परिवारअंतर्गत लॉकडाऊन काळात गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची त्यांनी मोफत टिफीन पोहोच केली आहे. सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा उपाध्यक्षपदी राजेश करेशिया मेहकर, सचिव महावीर व्यास खामगांव, सहसचिव मनोज खटोड, कोषाध्यक्ष सत्यनारायण शर्मा खामगांव, सहकोषाध्यक्ष फुलचंद व्यास लोणार, सदस्य नितीन दायमा मेहकर, सदस्य अभिषेक दायमा सखरखेरर्डा, ऋषिराज दायमा खामगांव, दुर्गानंदन दाधिच खामगांव व अशोक शर्मा खामगांव यांची निवड करण्यात आली आहे.
दायमा दाधिच महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी सुजित दायमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:38 IST