शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

महाराष्ट्र-गुजरातमधील दमणगंगा-पिंजर पाणीवाटप तंटा सुटला - नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 17:44 IST

बुलडाणा : दमणगंगा आणि पिंजर प्रकल्पांवरून महाराष्ट्र आणि गुजरातमधील पाणीवाटपाचा तंटा सुटल्यात जमा असून पुढील आठवड्यात या करारावर स्वाक्षऱ्या  होणार आहेत.

ठळक मुद्देमहाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दमणगंगा आणि पिंजर संदर्भात असलेला तंटाही संपुष्टात आला असून पुढील आठवड्यात यासंदर्भातील करारावर स्वाक्षरी होणार आहे.. परिणामी नाशिक, नगर, आणि मराठवाड्यातील धरणे १०० टक्के भरून या भागातील पाणी समस्या निकाली निघण्यास मदत होणार आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना गुजरात आणि महाराष्ट्रात झालेला यासंदर्भातील मुख्यमंत्र्यांना अमान्य होता.

- नीलेश जोशीबुलडाणा : दमणगंगा आणि पिंजर प्रकल्पांवरून महाराष्ट्र आणि गुजरातमधील पाणीवाटपाचा तंटा सुटल्यात जमा असून पुढील आठवड्यात या करारावर स्वाक्षऱ्या  होणार आहेत. परिणामी नाशिक, नगर, आणि मराठवाड्यातील धरणे १०० टक्के भरून या भागातील पाणी समस्या निकाली निघण्यास मदत होणार आहे. ३० हजार कोटी रुपयांचे हे प्रकल्प असून हे पाणी गोदावरी नदीत सोडण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय भुपृष्ठ, जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी बुलडाणा येथे दिली.बुलडाणा जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सुजलाम सुफलांम बुलडाणा अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत ते बुलडाण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, यापूर्वी राज्या राज्यात पाणीप्रश्नावर तंटे होते. पण आपण या खात्याचे मंत्री झाल्यानंतर हे तंटे मिटविण्याला प्राधान्य दिले असून नुकताच दक्षीणेतील दोन राज्यातील तंटा संपुष्टात आला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दमणगंगा आणि पिंजर संदर्भात असलेला तंटाही संपुष्टात आला असून पुढील आठवड्यात यासंदर्भातील करारावर स्वाक्षरी होणार आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना गुजराज आणि महाराष्ट्रात झालेला यासंदर्भातील मुख्यमंत्र्यांना अमान्य होता.त्यामुळे या प्रश्नी दिल्लीमध्ये बैठक बोलून तोडगा काढण्याचा प्रयत्न आपण केला होता. त्यात प्रारंभी यश आले नाही. परंतू नंतर सचिवांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्यात येऊन दमणगंगा आणि पिंजरमधील पाणी गोदावरी नदी सोडून नाशिक, नगर आणि मराठवाड्यातील धरणे १०० टक्के भरण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत आहे. ३० हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून मुख्यमंत्र्यांच्या आग्रहास्तव या भागातील चार धरणांचा प्रश्नही मार्गी लागत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या भाषणात म्हणाले.पाणीतंटे सोडविण्यावर भरराज्या राज्यात पाणीप्रश्नावरून असलेले तंटे सोडविण्यावर या खात्याचे मंत्री झाल्यानंतर आपण भर दिला आहे. उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातील दुष्काळी भागावरून असलेला तंटाही मार्गी लागत असून केनबेतवा प्रकल्पासाठी ४० हजार कोटी रुपयांची रुपरेषा ठरली आहे. त्यातही केंद्र सरकार ३० हजार कोटी रुपये टाकत असल्याचे गडकरी म्हणाले.तर दक्षीणेतील पाणीसमस्या सुटेलआंध्रप्रदेशातील पोलावरम धरणामुळे तेथे कृषी क्रांती झाली असून आंध्रात कृषीचे दहा हजार कोटींनी उत्पन्न वाढल्याचा दावा चंद्रबाबू नायडूंनी केला असल्याचे गडकरी म्हणाले. पोलावरम धरणातील १४० टीएमसी पाणी २१० किमी कॅनॉलद्वारे कृष्णा नदीत जोडण्यात आल्याने या भागात पाण्याची उपलब्धता होऊन हे उत्पन्न वाढले आहे. दरम्यान, तीन हजार टीएमसी पाणी गोदावरीमधून वाहून जात आहे. त्या पाण्याचे योग्य नियोजन करून धरणांमधील बॅक वॉटर पोलावरम, कृष्णा, पेरोममध्ये सोडल्यास आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक या चार राज्यांचा पाणीप्रश्न मिटण्यास मोठी मदत होईल. या माध्यमातून ७५० ते ८५० एमलटी पाणी वाचविल्यास मोठी मदत होईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाNitin Gadakriनितिन गडकरीMaharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरात