शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

बुलडाणा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान; सर्वेक्षणास झाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 11:53 AM

Pre-monsoon rains in Buldana : जिल्ह्यात या पावसामुळे महावितरणसह सर्वसामान्य नागरिकांचे ८ तालुक्यात नुकसान केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गत चार दिवसांपासून जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस बरसत असून या कालावधीत जिल्ह्यात या पावसामुळे महावितरणसह सर्वसामान्य नागरिकांचे ८ तालुक्यात नुकसान केले आहे. २९ मे रोजी चिखली तालुक्यातील दोन गावांत वीज पडून दोन गुरांचा मृत्यू झाला आहे. मान्सूनपूर्व हा पाऊस कमी अधिक प्रमाणात जिल्ह्यातील १३ ही तालुक्यांत बरसला असून खामगाव तालुक्यातील सुटाबा बुद्रूक येथील वर्षा भोपळे यांच्या स्वस्त धान्य दुकानावरील टीनपत्रे उडून गेल्यामुळे दुकानातील दोन ते तीन क्विंटल गहू व तांदूळ भिजल्याने नुकसान झाले आहे. खामगाव तहसीलदारांनी त्याचा अहवाल सादर गेला आहे. यासोबतच २८ मे रोजी शेगाव तालुक्यातील पहुरजिरा या गावात वादळी वाऱ्यासह अचानक झालेल्या पावसामुळे गाव परिसरातील १० ते १५ घरांवरील टिनपत्रे उडून गेली आहे. तसेच वाऱ्यामुळे उडालेले टीन लागून एका बैलाचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. याव्यतिरिक्त मलकापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथेही २९ मे रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे गावातील काही घरांवरील तथा गोठ्यांवरील टिनपत्रे उडून गेली आहेत. सुदैवाने आतापर्यंत जिल्ह्यात या पावसामुळे कोठेही जीवित हानी झाल्याची माहिती नाही. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस