शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस गॅस गोडाऊनमधील सिलिंडर चोरणारे अटकेत

By भगवान वानखेडे | Updated: April 5, 2023 15:10 IST

दोन लाख १९ हजाराचा मुद्देमाल जप्त : शहर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाची कारवाई

भगवान वानखेडे, बुलढाणा : पोलिस गॅस गोडाऊनमधील ३० सिलिंडर चोरणाऱ्या चार जणांना शहर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने अवघ्या सहा तासातच अटक केली. आरोपींकडून २ लाख १९ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध सुरु आहे.पोलिस विभागाला गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या पोलिस मुख्यालया मागील पोलिस गॅस गोडावूनमधील ३० गॅस सिलिंडरवर ४ एप्रिलच्या रात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेले होते.

याप्रकरणी कल्याण शाखेत कार्यरत असलेले आत्माराम नामदेव जाधव यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान ५ एप्रिल रोजी डीबी पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या काही तासातच संशयित आरोपी दामोदर तोताराम गायकवाड (४५,भीमनगर) यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे साथीदार सुनील संजय काळे उर्फ लेमन, नामदेव आनंदा खिल्लारे, दीपक सुरेश गोलांडे यांच्यासह चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेले ९९ हजार ६९० रुपयांचे ३० गॅस सिलिंडर, सिलिंडरची वाहतूक करण्यासाठी वापरलेला ॲपे क्रमांक एमएच-२८-ए-०१५४ असा एकुण २ लाख १९ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर या गुन्ह्यात आणखी काही चोरट्यांचा समावेश असून, अद्याप ते फरार आहे. त्या फरारींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक गठीत करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सखाराम सोनुने, माधव पेटकर, प्रभाकर लोखंडे, सुनील जाधव, महादेव इंगळे, गजानन जाधव, गंगेश्वर पिंपळे, युवराज शिंदे, विनोद बोरे, शिवहरी सांगळे यांनी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी