सरपंच आरक्षण साेडतीची उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:34 AM2021-01-20T04:34:02+5:302021-01-20T04:34:02+5:30

बुलडाणा : जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी राेजी मतदान घेण्यात आले. त्याचा निकाल १८ जानेवारी राेजी जाहीर झाला असून, ...

Curiosity about Sarpanch reservation | सरपंच आरक्षण साेडतीची उत्सुकता

सरपंच आरक्षण साेडतीची उत्सुकता

Next

बुलडाणा : जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी राेजी मतदान घेण्यात आले. त्याचा निकाल १८ जानेवारी राेजी जाहीर झाला असून, आता सरपंच काेण हाेणार, याविषयी गावागावात चर्चेचे फड रंगत आहेत. जिल्हा प्रशासनाने आधी जाहीर केलेले सरपंचपदाचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. आता येत्या २७ जानेवारी राेजी तहसीलस्तरावर व २९ जानेवारी जिल्हास्तरावर महिला आरक्षण साेडत निघण्याची शक्यता आहे.

मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचातींसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. यापैकी २८ ग्रामपंचायती अविराेध झाल्याने ४९८ ग्रामंपचायतींसाठी १५ जानेवारी राेजी मतदान घेण्यात आले. या मतदानाचा निकाल १८ जानेवारी राेजी जाहीर करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण पॅनल विजयी झाले आहेत, तर बहुतांश ठिकाणी सत्तेचे चित्र स्पष्ट झाले आहे. मेहकर तालुक्यातील डाेणगाव येथे अपक्षांच्या हाती सत्तेची चावी आहे. महाआघाडी सरकारने सरपंच पदाची थेट निवड रद्द केल्याने ग्रामपंचायत सदस्यांना पुन्हा महत्व आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत युवकही उत्साहाने सहभागी झाले आहेत. अनेक ठिकाणी युवकांनी प्रस्थापितांना धक्का दिला आहे. आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष सरपंच साेडतीकडे लागले आहे. सरपंचपदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण हे तालुकास्तरावर, तर महिला आरक्षण जिल्हास्तरावर काढण्यात येणार आहे. आरक्षण साेडतीनंतर सरपंचपद निवडीसाठी घडामाेडींना वेग येणार आहे. जिल्हा प्रशासनाने २७ जानेवारी राेजी तहसीलस्तरावर आणि २९ जानेवारी राेजी जिल्हास्तरावर महिला आरक्षण साेडत काढण्याचे नियाेजन केल्याची माहिती आहे. जिल्हा प्रशासनाने आरक्षण साेडतीची अधिकृत तारखेची घाेषणा केलेली नाही.

सरपंचपदही हाेईल का अविराेध

जिल्ह्यातील २८ ग्रामपंचायतींच्या सदस्यांची अविराेध निवड झाली आहे. यामध्ये खूपगाव, पळसखेड भट, सिंदखेड, चांधई, मालगणी, अंचरवाडी, खाेर व मलगी, पिंपळगाव बु., पाडळी शिंदे, नागणगाव, काेटी, हिवरागडलिंग, आंबेवाडी, कंडारी, माेहना खु., लावणा, पिंप्री काेरडे, पळशी खु., मांडका, टाकळी, काळेगाव, मानेगाव, कुंड बु., शेंबा खुर्द, पिपंळखुटा खुर्द, वसाडी खुर्द, काेल्ही गवळी, टाकळी घडेकर आदींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींमध्ये सरंपचांची निवडही अविराेध हाेणार का, याकडे लक्ष लागले आहे.

प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती

४९८

अविराेध ग्रामपंचायती

२८

एकूण सरपंचपदाची आरक्षण साेडत

५२६

Web Title: Curiosity about Sarpanch reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.