शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बुलडाणा जिल्ह्यात १४४ कोटींचे पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 14:02 IST

जिल्ह्यात ८.१७ टक्केच पीक कर्ज वाटप झाले असून १८ हजार १३६ शेतकऱ्यांना त्याचा लाभ झालेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात गत वर्षीच्या तुलनेत पावसाने दमदार हजेरी लावलेली असतानाच पीक कर्ज वाटपाचा टक्काही दमदार पद्धतीने वाढविण्याची गरज आहे. वर्तमान स्थितीत मात्र जिल्ह्यात ८.१७ टक्केच पीक कर्ज वाटप झाले असून १८ हजार १३६ शेतकऱ्यांना त्याचा लाभ झालेला आहे.बुलडाणा जिल्हयातील तीन लाख ७१ हजार ७२ शेतकऱ्यांची प्रामुख्याने पीक कर्जावर मदरा आहे. त्या तुलनेत विचार करता वर्तमान स्थितीत १८ हजार १३६ शेतकºयांनाच पीक कर्ज वाटप झालेले आहे. १४४ कोटी ८३ लाख ७८ रुपयांचे पीक कर्ज आतापर्यंत वाटप झालेले आहे. यंदा जिल्ह्यात एक हजार ७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट आहे. लोकसभा निवडमुकीमध्ये प्रारंभी पीक कर्ज वाटपाचा वेग काहीसा संथ गतीने होता. मात्र त्यानंतर याचा वेग वाढणे अपेक्षीत होते. मात्र जून महिन्यात प्रारंभीच्या तीन आठवडे पावसाने दडी मारल्याने शेतकºयांनी पीक कर्ज घेण्यात फारसा रस दाखवला नव्हता. मात्र त्यानंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पीक कर्जाचा टक्का हा वाढण्यास प्रारंभ झाला. परंतू अपेक्षेप्रमाणे हे पीक कर्ज वाटप झाले नसल्याचे चित्र पाच जुलै रोजीच्या प्रत्यक्ष आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. प्रामुख्याने जिल्ह्यात आतापर्यंत सेंट्रल बँकेने दोन हजार ५५४ शेतकºयांना १७ कोटी २३ लाख ९८ हजार रुपयांचे, स्टेट बँकेने तीन हजा ७९१ शेतकºयांना २९ कोटी २५ लाख ८३ हजार, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने दोन हजार ३९० शेतकºयांना २० कोटी ३३ लाख ४६ हजार तर जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने चार हजार ७६८ शेतकºयांना २२ कोटी ९१ लाख ५७ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. एचडीएफसी बँकेनेही ७६६ शेतकºयांना १७ कोटी ९२ लाख ९३ हजार, आयसीआयसीआय बँकेने ७५९ शेतकºयांना नऊ कोटी ६७ लाख रुपयांचे पीक कर्ज आतापर्यंत वाटप केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्जagricultureशेतीFarmerशेतकरी