शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामाला पीक विमा योजनेचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 15:39 IST

बुलडाणा : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. ज्वारी, मका, तूर, मुग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ आणि कापूस पिकाला विमा लागू करण्यात आला आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी २४ जुलपर्यंतची मुदत आहे.पीक पेरणीपासुन काढणीपर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट, पीक पेरणी अथवा लावणीपूर्वी नुकसान भरपाई निश्चित करणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे, काढणी पश्चात नुकसान, नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देता येणार आहे. तसेच पिकांच्या नुकसानाच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखून शेतकºयांना नुकसान झाल्यास आर्थिक मदतीची शाश्वती मिळणार आहे. जिल्ह्यातील विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकºयांनी सहभागी होवून आपल्या पिकांचा विमा उतरवून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी केले आहे.जिल्ह्यातील कर्जदार शेतकºयांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी पिक विमा बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकºयांना ऐच्छिक आहे. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यासाठी पात्र आहेत. शेतकºयांवरील विम्याच्या हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकºयांनी भरावयाचा विमा हप्ता कापूस पिकासाठी ५ टक्के व अन्य पिकांसाठी दोन टक्के मर्यादित ठेवण्यात आला आहे. योजनेतील विमा उतरविलेल्या पिकांसाठी जोखिम स्तर ७० टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. ऐच्छिक शेतकºयांना विमा योजनेत सहभागी होण्याची अंतीम मुदत २४ जुलै आहे. कापूस व सोयाबीन या मुख्य पिकांना ४३ हजार रुपये विमा संरक्षण देण्यात आले आहे. कापूस व सोयाबीन हे जिल्ह्यातील मुख्य पीक आहे. शेतकरी सर्वात जास्त सोयाबीन व कापसाचा सर्वात जास्त पेरा करतात. घाटाखाली व घाटावर अशी बुलडाणा जिल्ह्याची विभागणी झालेली आहे. काही प्रमाणात पिक लागवडीची पध्दत वेगळी असली तरी दोन्हीकडे कापूस, सोयाबीन पिक घेतले जाते. शासनाने खरीप हंगामासाठी पीक विमा योजना लागू केली आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. शेतकºयांनी अंतीम मुदतीची वाट न बघता जास्तीत जास्त प्रमाणात पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे.

अर्ज भरताना ही लागणार कागदपत्रेअर्ज भरताना आला फोटो असलेल्या खातेपुस्तकाची प्रत, आधार कार्ड प्रत, आधार कार्ड उपलब्ध नसल्यास आधारकार्ड नोंदणी पावती किंवा किसान क्रेडीट कार्ड, नरेगा जॉबकार्ड कार्ड, वाहन चालक परवाना व मतदान ओळखपत्र यापैकी एक पुरावा सोबत आणावा. तसेच कर्जदार शेतकºयांनी आपले बँकेचे कर्ज खात्याशी आधार क्रमांक जोडला नसल्यास संबंधित बँकेशी त्वरीत संपर्क साधावा. त्याचप्रमाणे बिगर कर्जदार शेतकºयांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता आधार क्रमांकाशी जोडले गेलेले बँक खाते क्रमांकच अर्जावर नमूद करावा लागणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीagricultureशेती