शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यासाठी पायपीट संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 15:14 IST

बँक, विमा कंपनी कार्यालय तसेच कृषी कार्यालयात चकरा मारून शेतकरी हैराण झाले आहेत.

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : गतवर्षी शेतकऱ्यांनी काढलेल्या पीक विम्याची रक्कम हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप जमा झालेली नाही. अनेकांच्या कागदपत्रांमध्ये त्रुट्या असल्याने त्यांची पुर्तता करता-करता शेतकºयांच्या नाकीनऊ येत आहेत. बँक, विमा कंपनी कार्यालय तसेच कृषी कार्यालयात चकरा मारून शेतकरी हैराण झाले आहेत.खामगाव तालुक्यातील हजारो शेतकºयांना अद्याप पीक विमा मिळाला नाही. बँक खात्यात विम्याची रक्कम जमा झाली का? हे पाहण्यासाठी शेतकरी बँकांमध्ये चकरा मारत आहेत. परंतु त्यांना खात्यात रक्कम जमा झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बँकेतून शेतकरी पुन्हा कृषी कार्यालयाकडे वळत आहेत. येथे त्यांना विमा कंपनी कार्यालय गाठण्याचा सल्ला देण्यात येत आहे. यानंतर विमा कंपनी कार्यालयाशी संपर्क केल्यानंतर एक ते दोन महिन्यात रक्कम जमा होईल, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान या सर्व प्रकारात शेतकºयांच्या नशीबी केवळ चकरा मारणे एवढाच उद्योग उरला असल्याचे दिसून येत आहे. सध्या पेरणीचे दिवस आहेत. अनेकांच्या शेती मशागतीची कामे अपुर्ण आहेत. त्यामुळे या दिवसात शेतीची मशागत करण्याचे सोडून शेतकºयांना खामगावात येऊन सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. मुळात पीक विमा योजना केंद्र शासनाची, जनजागृती कृषी विभागाची, रक्कम जमा होते बँकेत, आणि चौकशी करावी लागते विमा कंपनीच्या कार्यालयात. त्यामुळे अशा सर्व कार्यालयांच्या वाºया करताना, शेतकºयांची चांगलीच दमछाक होत आहे. शेवटी विमा कार्यालयात जाऊन आल्यानंतर पुन्हा खाली हात परतावे लागत आहे.

यात शेतकºयांना प्रचंड मनस्ताप होत असून याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.गतवर्षी सन २०१८ मध्ये पीक विमा काढला होता. कागदपत्रांमध्ये त्रुट्या नसतानाही अद्याप पीक विम्याची रक्कम खात्यात जमा करण्यात आली नाही. विमा कंपनीच्या कार्यालयात गेलो असता, १ महिन्यानंतर रक्कम जमा होईल, असे सांगण्यात आले.-विठ्ठल भिसेशेतकरी, आसा-दुधा ता.खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा