शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तुरीवर मारूका अळीचा प्रादुर्भाव, ८० हजार हेक्टरवरील पीक धोक्यात

By विवेक चांदुरकर | Updated: September 8, 2022 15:34 IST

जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात ७९ हजार ३५० हेक्टरवर तुरीची पेरणी करण्यात आली आहे.

खामगाव :

जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात ७९ हजार ३५० हेक्टरवर तुरीची पेरणी करण्यात आली आहे. सध्या पीक परिस्थिती चांगली असतानाच तुरीवर मारूका अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे जवळपास ८० हजार हेक्टरवरील पीक धोक्यात आले असून, शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

तूर पिकावर जिल्ह्यात काही ठिकाणी मारूका या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यावर्षी चांगले पाऊसमान असल्यामुळे तुरीचे पीक चांगले आहे. पीक वाढीच्या अवस्थेत आहे. लवकरच पीक फुलोरा अवस्थेत येईल. मात्र, सद्यस्थितीत काही शेतांमध्ये तुरीच्या शेंड्यावरील पाने जाळे विणून गुंडाळणारी अळी दिसून आली आहे. फुले धरण्याच्या अवस्थेत ही मारूका अळी फुलांचे तसेच शेंगांचे नुकसान करते. मागील पंधरवड्यातील असणारे पावसाळी वातावरण तसेच रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील मारूका अळीच्या वाढीस पोषक आहे. या वातावरणामुळे तूर पिकाला मारूका अळ्यांपासून नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची पाहणी करून वेळीच व्यवस्थापनाचा उपाय करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. या किडीचा पतंग करड्या रंगाचा असून मागील पंखावर पांढरे पट्टे आढळून येतात. मादी पतंग कळ्या, फुले व शेंगांवर अंडी घालतात. अळी पांढुरक्या रंगाची व अर्धपारदर्शक असते. तिच्या पाठीवर काळ्या रंगाच्या सहा ठिपक्यांच्या जोड्या असतात. अंड्यातून निघालेली अळी कळ्या, फुले व शेंगांना एकत्रित करून जाळ्याने चिटकवून झुपके तयार करून त्या आतमध्ये राहून कळ्या, फुले खाते.

असे करा व्यवस्थापनया किडीचा जीवनक्रम १८ ते ३५ दिवसांत पूर्ण होतो. किडीच्या व्यवस्थापनासाठी तूर पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत तेथे सर्वेक्षण करून शेतात २० ते २५ ठिकाणी प्रती मीटर ओळीत पाहणी करावी. किडीचा प्रादुर्भाव सरासरी २ ते ३ अळ्या प्रती मीटर ओळीच्या अंतरात दिसून आल्यास गरजेनुसार कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी. यात फ्लूबेडामाईड २० डब्ल्यूजी ६ ग्रॅम किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी २० ग्रॅम किंवा नोवालूरोन ५.२५ अधिक इंडोक्साकार्ब ४.५० एससी १६ मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी