शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जांबुळधाबा उपकेंद्राच्या जाळपोळप्रकरणी नगराध्यक्ष हरिश रावळ व आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 20:40 IST

मलकापूर (बुलडाणा): तालुक्यातील जांबुळधाबा उपकेंद्रावरील खेडेविभागाची लाईट गेल्या तीन दिवसांपासून बंद असल्याने संतप्त शेतक-यांनी अ‍ॅड.हरिश रावळ, राजु पाटील आदींच्या नेतृत्वात कार्यालयाची जाळपोळ केल्याने याबाबतची तक्रार ग्रामीण पोस्टेला कनिष्ठ अभियंता मराविवि खुपचंद उध्दवराव पवार यांनी दिली. यावरुन ग्रामीण पोलीसांनी अ‍ॅड.हरिश रावळ यांच्यासह ७ ते ८ जणांविरुध्द गुन्हे दाखल केले.

ठळक मुद्देखंडित विद्युत पुरवठा सुरु करण्यासाठी सोमवारी कार्यकर्त्यांनी केले आंदोलनआंदोलनकर्त्यांनी केली कार्यालयाची जाळपोळ

लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर (बुलडाणा): तालुक्यातील जांबुळधाबा उपकेंद्रावरील खेडेविभागाची लाईट गेल्या तीन दिवसांपासून बंद असल्याने संतप्त शेतक-यांनी अ‍ॅड. हरिश रावळ, राजु पाटील आदींच्या नेतृत्वात कार्यालयाची जाळपोळ केल्याने याबाबतची तक्रार ग्रामीण पोस्टेला कनिष्ठ अभियंता मराविवि खुपचंद उध्दवराव पवार यांनी दिली. यावरुन ग्रामीण पोलीसांनी अ‍ॅड.हरिश रावळ, राजु पाटील, गजानन ठोसर, बंडू चौधरी, विजय पाटीलसह अधिक ७ ते ८ जणांविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत.जाबुंळधाबा उपकेंद्राअंतर्गत येणा-या खेडे विभागातील दहा डि.पी.गेल्या तीने दिवसांपासून विद्युत पुरवठा बंद असल्याने गुराढोरांसह ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा व रब्बी पिकांचे हाल लक्षात घेता अ‍ॅड.हरिश रावळ, राजु पाटील सह काँग्रेस पदाधिकाºयांनी शेतकºयांसह उपकेंद्र गाठले उपकेंद्राची जाळपोळ करुन जोपर्यंत विद्युत पुरवठा पुर्ववत सुरु होत नाही आम्ही मलकापूर येथील कार्यालयाची जाळपोळ करण्याचा इशारा रावळ यांनी देताच एकातासाच्या आत लाईनमन येवून पुरवठा सुरु केला. कार्यालयाची जाळपोळ केल्याप्रकरणी व कर्मचाºयांना दमदाटी करुन दहशतीचे वातावरण निर्माण करुन मराविमं कंपनीचे नुकसान केल्याप्रकरणी अ‍ॅड.हरिश रावळ, राजु पाटील, गजानन ठोसर, बंडूभाऊ चौधरी, ज्ञानेश्वर निकम, विजय पाटील, अधिक सात ते आठ आंदोलनकर्त्यांसह एकूण तेरा जणांविरुध्द भारतीय विद्युत अधिनियम १३८ सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कलम १४३, ४४८, ४३५, १८६ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सोनवणे करीत आहे. 

जनतेच्या ज्वलंत प्रश्नांसाठी असे कितीही गुन्हे दाखल झाले तर मी माघार घेणार नाही, जनतेच्या सेवेसाठी सैदव तत्पर राहतील- अ‍ॅड. हरिश रावळ, नगराध्यक्ष 

टॅग्स :khamgaonखामगावmahavitaranमहावितरणCrimeगुन्हा