शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: डोक्यात दगड घालून महिलेची हत्या, आरोपी अटकेत, धक्कादायक कारण आलं समोर

By निलेश जोशी | Updated: December 17, 2022 16:34 IST

Crime News: औरंगाबाद जिल्ह्यातील सुलतानपूर येथून काही काळासाठी सैलानी येथे वास्तव्यास आलेल्या ५५ वर्षीय महिलेची भडगाव शिवारात हत्या केल्याप्रकरणी परभणी जिल्ह्यातील साडेगाव येथील रहिवाशी व सैलानीत वास्तव्यास असलेल्या बाळासाहेब मुंजाजी बारहते यास पोलिसांनी अटक केली आहे.

- नीलेश जोशीबुलढाणा  - औरंगाबाद जिल्ह्यातील सुलतानपूर येथून काही काळासाठी सैलानी येथे वास्तव्यास आलेल्या ५५ वर्षीय महिलेची भडगाव शिवारात हत्या केल्याप्रकरणी परभणी जिल्ह्यातील साडेगाव येथील रहिवाशी व सैलानीत वास्तव्यास असलेल्या बाळासाहेब मुंजाजी बारहते यास पोलिसांनी अटक केली आहे.

भडगाव शिवारात १४ डिसेंबर रोजी लता कोतकर या महिलेचा डोक्यात दगड टाकून खून केलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. प्रकरणी रायपूर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी मृत महिलेचा मुलगा विलास मुरलीधर कोतकर याने रायपूर पोलिसात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाच्या तपासात पोलिसांना लता कोतकर या महिलेला परभणी जिल्ह्यातील परंतु सैलानी येथे राहत असलेल्या बाळासाहेब मुंजाजी बारहते याने सरपण आणण्याच्या बहाण्याने भडगाव शिवारात नेले हाेते. तेथे जुन्या वादातून त्याने लता कोतकर यांची डोक्यात कुऱ्हाड घालून व नंतर दगडाने डोके ठेचून खून केल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी तपास करत बाळासाहेब बारहते यास अटक केली. या गुन्ह्याचा तपास ठाणेदार राजवंत आठवले यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलिस हेडकॉन्स्टेबल शांताराम जाधव, नायक पोलिस कॉन्स्टेबल श्रीकांत चिटवार, सहायक पोलिस निरीक्षक अमेल बारापात्रे, नायक पोलिस कॉन्स्टेबल अमोल गवई व अन्य सहकाऱ्यांनी केला होता.

१६ डिसेंबरला आरोपीस घेतले ताब्यातया प्रकरणात बाळासाहेब बारहते यास १६ डिसेंबर रोजी रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली. बाळासाहेब आणि लता कोतकर यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्याचा राग डोक्यात ठेवून त्याने लता कोतकर यांना भडगाव जंगलात लाकडे आणण्याच्या बहाण्याने नेले होते. तेथे त्याने तिची हत्या केली. अप्पर पोलिस अधीक्षक बीबी महामुनी, एसडीपीअेा सचिन कदम यांनीही या प्रकरणात तपासात रायपूर पोलिसांना मार्गदर्शन केल्याची माहिती ठाणेदार राजवंत आठवले यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा