शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

Crime News: ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवारातच चोरी! आॅटोचे सायलेंसर कापताना पोलिसांनी चोरट्यास रंगेहात पकडले

By अनिल गवई | Updated: October 8, 2022 16:30 IST

Crime News: पोलीसांनी एका गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनाचे सायलेंसर कापून नेत असताना एका चोरट्यास रंगेहात पकडण्यात आले. ही घटना ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवारात घडली.

- अनिल गवई  खामगाव -  पोलीसांनी एका गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनाचे सायलेंसर कापून नेत असताना एका चोरट्यास रंगेहात पकडण्यात आले. ही घटना ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवारात घडली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलीसांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी चोरट्यास पकडले. त्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खामगाव येथील इंदिरा देशमुख नगर रस्त्यावर ग्रामीण पोलीस स्टेशन आहे.  या पोलीस स्टेशनच्या आवारात एका गुन्ह्यात पोलीसांनी एमएच २८ बी ९७८९ या क्रमांकाचा आॅटो जप्त केला आहे. या आॅटोचे सायलेंसर भीमराव शंकरराव काळे (७५, रा. बुध्द विहाराजवळ, शंकर नगर, खामगाव) हा इसम लोखंडी करवतीने कापून नेत होता. ही घटना पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोकॉ  गोविंद इंगळे यांच्या निदर्शनास पडली. त्यांनी ताबडतोब त्यांचे सहकारीसंजय सदांशिव, पोकॉ शुध्दोधन गवारगुरू, संजय काकडे यांच्या मदतीने आरोपीला रंगेहात पकडले. त्याच्या जवळून ०४ नग लोखंडी एक्सा ब्लेड, एक पिशवी जप्त केली. याप्रकरणी गोविंद इंगळे यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भीमराव काळे विरोधात भादंवि कलम ३७९, ५११ गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी