शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उडीद खरेदी प्रकरणात तिघांवर बुलडाण्यात गुन्हे दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:42 IST

चिखली : नाफेडच्या उडीद खरेदीमध्ये गैरप्रकारे उडीद विकून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी मार्केटींग अधिकारी पंढरीनाथ शिंगणे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देआरोपींची संख्या वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : नाफेडच्या उडीद खरेदीमध्ये गैरप्रकारे उडीद विकून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी मार्केटींग अधिकारी पंढरीनाथ शिंगणे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.नाफेडच्या उडीद खरेदीमध्ये चिखली आणि बुलडाण्यात प्रचंड अपहार झाला असून, शेतकर्‍यांच्या नावावर व्यापारी, दलालांनी तूर विकली आहे. जिल्हा उपनिबंधकांनी चौकशी समितीचे गठन करून चौकशीला सुरुवात केलेली आहे. दरम्यान, बुलडाणा येथील खरेदी केंद्रावर तीन शेतकर्‍यांनी २९ डिसेंबर २0१७ पूर्वी शासकीय उडीद खरेदीत गैरप्रकार करून शासनाची ३ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची बाब उघड झाल्याने प्रभारी मार्केटिंग अधिकारी शिंगणे यांनी बुलडाणा पोलिसांत ७ फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी नागेश गजानन बाहेकर, समाधान तेजराव बाहेकर, विजय राघोजी बाहेकर रा.किन्होळा यांच्याविरुद्ध अप.क्र.७३/१८ कलम ४२0, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कवास करीत आहेत.

आरोपींची संख्या वाढणारचिखली आणि बुलडाणा या दोन्ही उडीद खरेदी केंद्रावर गैरप्रकारे उडीद विक्री करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणच्या उडीद खरेदीची कसून चौकशी सुरु  आहे. प्रथम टप्प्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला असून, आणखीही काही जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, या कारवाईमुळे उडीद खरेदीत अपहार करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrimeगुन्हा