शहरं
Join us  
Trending Stories
1
लुथरा बंधूंचे थायलंडमधून फोटो आले, पासपोर्टसह घेतले ताब्यात; कारवाईपासून वाचण्यासाठी पळाले खरे पण...
2
"इथं येऊन तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर..."; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
3
"मला गुन्हा कबूल नाही." राज ठाकरेंचं कोर्टात उत्तर; न्यायाधीश म्हणाले, सहकार्य करा, काय घडलं?
4
Mumbai Airport: मुंबई विमानतळाला धमकीचा ईमेल, 'या' विमानांत स्फोटकं, दर अर्ध्या तासाला उडवून देणार!
5
भयंकर! पूर्वांचल एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात; कॉन्स्टेबलच्या कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
"पाकिस्तानात मॉल कुठून आला?", 'धुरंधर'मधील 'ती' चूक नेटकऱ्यांनी पकडली, व्हिडीओ होतोय व्हायरल
7
मार्गशीर्ष गुरुवार: पुण्याजवळील जागृत दशभुजा दत्त मंदिर: जिथे 'नास्तिक' अधिकारी झाला दत्तभक्त!
8
मिस्ड कॉलने सुरू झालेली प्रेम कहाणी... दोनदा लग्न, दोनदा घटस्फोट, 'हलाला' आणि आता थेट लैंगिक शोषणाची तक्रार!
9
मुलांचे शिक्षण-लग्नासाठी गुंतवणूक करताय? महागाईमुळे तुमच्या बचतीची किंमत किती घटते? वाचा संपूर्ण गणित
10
हनुमानगढमध्ये मोठा हिंसाचार! इथेनॉल फॅक्टरीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा उद्रेक; १६ वाहनांना आग, काँग्रेसचे आमदार जखमी
11
दहशतवादी कृत्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी पडघ्यातील बोरिवली गावात रात्रभर ED, ATS ची छापेमारी
12
Sovereign Gold Bond: ₹२,९५४ च्या गुंतवणूकीवर ₹१२,८०१ चा रिटर्न; गुंतवणूकदारांना कुठे मिळतोय ४ पट पैसा, जाणून घ्या
13
‘क्रिकेटएवढं मला काहीही प्रिय नाही’; लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाची पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी
14
टॅरिफ वॉरचे नवे संकट! आधी अमेरिका, आता मेक्सिकोचा ५०% टॅरिफ हल्ला; भारत-चीनसह अनेक देशांना मोठा झटका
15
६ वर्षांतील सर्वात मोठे मतभेद! फेडरल रिझर्व्हमध्येच धोरणांवर एकमत नाही; व्याजदरात कपात केली पण...
16
सार्वजनिक हिताचा विचार करूनच होर्डिंग्जचे निर्णय घ्या; उच्च न्यायालयाचा जाहिरातदारांना परवाना शुल्कात दिलासा देण्यास नकार
17
मोठी बातमी! थायलंड पोलिसांनी लूथरा बंधूंना फुकेतमध्ये पकडले; भारतात आणले जाणार...
18
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, IT आणि मेटल शेअर्समध्ये मोठी खरेदी
19
मोठी बातमी! गोवा आग दुर्घटनेनंतर देश सोडून पळणाऱ्या लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित
20
US Seizes Oil Tanker: हेलिकॉप्टरमधून उतरले आणि तेलाचे जहाज केले जप्त, व्हेनेझुएलाच्या किनाऱ्यावर अमेरिकेची मोठी लष्करी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील शहीद जवानांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 14:28 IST

गडचिरोली जिल्ह्यातील भूसुरूंग स्फोटात  शहीद झालेल्या सर्जेराव  उर्फ संदीप एकनाथ खार्डे (३०, रा. आळंद, ता. देऊळगाव राजा) आणि मेहकर येथील राजू नारायण गायकवाड (३२) यांच्या पार्थिवावर ३ मे रोजी दुपारी १२.३० ते १ च्या दरम्यान शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देशहीद झालेल्या जवानांना गडचिरोली येथे २ मे राजी श्रद्धांजली वाहण्यात आल्यानंतर त्यांचे पर्थिव ३ मे रोजी  बुलडाणा जिल्ह्यात पोहचले. राजू नारायण गायकवाड यांचे पार्थिव मेहकर येथे आल्यानंतर दुपारी १२.३० वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. सर्जेराव उर्फ संदीप यांचे पार्थिव हे देऊळगाव राजा तालुक्यातील आळंद येथे आनल्यानंतर शहीद जवानांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मेहकर/देऊळगाव राजा:  गडचिरोली जिल्ह्यातील भूसुरूंग स्फोटात  शहीद झालेल्या सर्जेराव  उर्फ संदीप एकनाथ खार्डे (३०, रा. आळंद, ता. देऊळगाव राजा) आणि मेहकर येथील राजू नारायण गायकवाड (३२) यांच्या पार्थिवावर ३ मे रोजी दुपारी १२.३० ते १ च्या दरम्यान शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवनांच्या अंत्यदर्शनासाठी अनेकांनी गर्दी केली होती. गडचिरोली जिल्ह्यातील जांभूरखेड नजीक नक्षलींनी भूसुरूंग स्फोट घडविला होता. त्यात १५ जवान शहीद झाले होते. त्यात बुलडाणा जिल्ह्याच्या दोन जवानांचाही समावेश होता. या घटनेत शहीद झालेल्या जवानांना गडचिरोली येथे २ मे राजी श्रद्धांजली वाहण्यात आल्यानंतर त्यांचे पर्थिव ३ मे रोजी  बुलडाणा जिल्ह्यात पोहचले. दरम्यान, शहीद जवान राजू नारायण गायकवाड यांचे पार्थिव मेहकर येथे आल्यानंतर दुपारी १२.३० वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. तर सर्जेराव उर्फ संदीप यांचे पार्थिव हे देऊळगाव राजा तालुक्यातील आळंद येथे आनल्यानंतर शहीद जवानांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. संदीप खार्डे यांचे चुलत भाऊ समाधान खार्डे यांनी मुखाग्नी दिला.   शहीद जवान राजू गायकवाड यांच्या पार्थिवावर जानेफळ रोडवरील मोक्षधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तर आळंद येथे शहीद जवान संदीप खार्डे यांच्या पार्थिवावर त्यांच्या शेतातच अंत्यसंस्कार करण्यात आले.  अंत्यसंस्काराला बुलडाणा पोलीस दलाचे अधिकारी, कमांडे पथक, लोकप्रतिनिधी व परिसरातील महिला व पुरूषांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.

 

जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलीशहीद जवान राजू गायकवाड व संदीप खार्डे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी जमली होती. यावेळी नक्षलवादाच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. नक्षलवाद नष्ट कर, अशा घोषणा देऊन प्रत्येकाच्या मनात देशभक्ती जागृत झाल्याचे चित्र दिसून आले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाGadchiroliगडचिरोलीMartyrशहीदMehkarमेहकरDeulgaon Rajaदेऊळगाव राजा