शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

गोठ्याला आग, दोन लाखांचे नुकसान, दोनजण जखमी: शेतीच्या साहित्यासह गुरांचा चारा जळून खाक

By ब्रह्मानंद जाधव | Updated: March 16, 2023 17:35 IST

Buldhana News: बुलढाणा तालुक्यात धामणगाव मासरूळ ते वरुड रस्त्यावरील गोठ्याला आग लागून दोन लाख रुपयांच्यावर नुकसान झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीदरम्यान घडली.

- ब्रह्मानंद जाधव

मासरूळ : बुलढाणा तालुक्यात धामणगाव मासरूळ ते वरुड रस्त्यावरील गोठ्याला आग लागून दोन लाख रुपयांच्यावर नुकसान झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीदरम्यान घडली. यामध्ये दोनजण जखमी झाले आहेत. तसेच शेतीसाठी लागणारे अवजारे, ठिबक सिंचन, एक वर्ष पुरेल एवढा चारा असून या गोठ्यावरील टिन जळून खाक झालेली आहे.

आग विझवताना शेतकरी व त्याच्या मुलाला दुखापत झाली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मासरूळ येथील गंगाराम पायघन यांचा त्यांच्या घराजवळ गोठा आहे. गोठ्याला बुधवारी मध्यरात्री एक वाजताच्या दरम्यान आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवाय या आगीत गोठ्यामध्ये ठेवलेले शेती साहित्यही जळून खाक झाले. गोठ्याला घर लागून असल्याने रामफळ, लिंबाचे झाड, शेतातील मका काढून वाळू घातलेली असून तिचा ढीग सुद्धा थोडाफार जळून नुकसान झाले आहे. यामध्ये जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले आहे. गोठ्याला आग लागल्याची माहिती कळताच मासरूळ येथील माजी सरपंच शेषराव सावळे, मधुकर महाले, पोलीस पाटील देविदास पवार, तलाठी कानडजे, माजी पंचायत समिती सदस्य दिलीप शिनकर, ग्रामपंचायत सदस्य किरण उगले, नंदकिशोर देशमुख, संभाजीराव देशमुख यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा करून अहवाल शासनस्तरावर पाठविला.

घरातील कुटुंबाची तारांबळमध्यरात्री अचानक लागलेल्या आगीमुळे पायघन कुटुंबाची तारांबळ उडाली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी गंगाराम पायघन यांचे मुले व पत्नी, सुना आणी त्यांचा मुलगा सर्व कुटूंबांनी धडपड केली. दरम्यान, आगीच्या या रौद्र रूपात दोनजण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. आग विझविण्यासाठी आजूबाजूचे शेतकरी धावून शेतातील मोटर पंप चालू करून आग आटोक्यात आणली. या घटनेत शेतकऱ्याचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तातडीने पीडित शेतकऱ्याला मदतीची मागणी केली जात आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाfireआग