शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहुची दुचाकीला धडक; दाम्पत्य ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 13:04 IST

या अपघातात दुचाकीस्वार जगदीश महादेव मुंडे (वय ३०) व त्यांची पत्नी लक्ष्मी (वय २५) यांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देत्यांची दोन वर्षीय मुलगी श्रेया बालंबाल बचावली.मालवाहू वाहनाचा चालक घटनास्थळावरून पळून गेला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव राजा  : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पिंपळगाव राजा - घाटपुरी रस्त्यावरील पाणी जलशुद्धीकरण केंद्राजवळ रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मालवाहू वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जगदीश महादेव मुंडे (वय ३०) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी लक्ष्मी (वय २५) यांचा खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात त्यांची २ वर्षाची मुलगी श्रेया हिला कुठलीही दुखापत झालेली नाही.      ढोरपगाव येथील मुंडे दाम्पत्य मुलगी श्रेयासह दुचाकीने खामगावकडे जात होते. घाटपुरीनजीक असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ भरधाव मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत जगदीश यांचा जागीच मृत्यू झाला तर लक्ष्मी मुंडे या गंभीर जखमी झाल्या. त्यांची प्रकृती चिंताजनक असतानाच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, त्यांची दोन वर्षीय मुलगी श्रेया बालंबाल बचावली.     या अपघाताची माहिती नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांना दिली; मात्र तोपर्यंत मालवाहू वाहनाचा चालक मुसताक खान करजत खान (रा. मोताळा) हा घटनास्थळावरून पळून गेला होता.  पिंपळगाव राजा येथील गणेश सातव यांनी या वाहनचालकाला वाहन क्रमांक (एमएच २८, एबी ३९६४)सह ताब्यात घेऊन पिंपळगाव राजा पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी आरोपीला शिक्षा न झाल्यास पोलीस प्रशासनाच्या कारवाईचा निषेध नोंदवला जाणार आहे. या घटनेचा तपास शिवाजीनगरचे ठाणेदार सुनील हुड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात