शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

टूनकी-जळगाव रस्त्यावर अपघातात तेल्हारा तालुक्यातील दाम्पत्य ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 15:36 IST

Accident News :टूनकी ते जळगाव रस्त्यावरील लाडणापूर जवळ ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूरः टूनकी ते जळगाव रोडवर चार चाकी व दूचाकी वाहनांची अमोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात पती पत्नी ठार, तर अन्य एक जण जखमी झाला आहे. ही घटना सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान लाडणापुर फाट्याजवळ घडली. टूनकी कडून एम एच १५ ई जी १९६१ क्रमांकाचे चार चाकी वाहन जळगाव कडे जात होते. तर एम एच ३० पी ५६४९ क्रमांकाची दुचाकी जळगाव कडून टूनकी कडे येत असताना दोघांमध्ये समोरा समोर अपघात घडला. या अपघातात दूचाकीवरील पती-पत्नी ठार झाले आहे. तर चार चाकी वाहन चालक जखमी झाला आहे. मृतकामध्ये तेल्हारा तालुक्यातील सौंदळा येथील गोविंदा किसन तायडे ६० वर्ष व पत्नी प्रमीला  तायडे या दोघांचा समावेश आहे.  घटनेची माहिती प्राप्त होताच सोनाळा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत अत्यवस्थ अवस्थेत पडलेल्या दोघांना रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल येथे हलविले. मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले होते. डॉक्टरांकडून प्राप्त माहितीनुसार  गोविंदा तायडे यांच्या छाती व हाताला जबर मार लागला तर  प्रमिला तायडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने अपघाताच्या अर्ध्या तासातच दोघांचा मृत्यू झाला. तर चार चाकी वाहन चालकाला पोलिसांनी जखमी अवस्थेत सोनाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला शेगाव येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरTelharaतेल्हाराAccidentअपघात