शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकाची ‘गांधीगिरी’, कामचुकार कर्मचाऱ्यांचा मुजोरीपणा कायम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 16:11 IST

बुलढाणा : खामगाव येथे वेळेचे बंधन पाळून काम करणे ही कार्यालयीन संहिता असली, तरी परिस्थिती पाहून काम करण्याचे सुत्रच ‘प्रॅक्टिकल आऊटपूट’ देतात, हा अनौपचारिक अनुभव प्रत्येक कार्यालयात दिसून येतो. त्यामुळे निव्वळ वेळेत आणि वेळेतच काम करण्याची बंधने जिथे येतात, तिथे कर्मचारी केवळ वेळ पाळायची म्हणून काम करतात. हाच अनुभव सध्या ...

बुलढाणा : खामगाव येथे वेळेचे बंधन पाळून काम करणे ही कार्यालयीन संहिता असली, तरी परिस्थिती पाहून काम करण्याचे सुत्रच ‘प्रॅक्टिकल आऊटपूट’ देतात, हा अनौपचारिक अनुभव प्रत्येक कार्यालयात दिसून येतो. त्यामुळे निव्वळ वेळेत आणि वेळेतच काम करण्याची बंधने जिथे येतात, तिथे कर्मचारी केवळ वेळ पाळायची म्हणून काम करतात. हाच अनुभव सध्या खामगाव नगरपालिकेत येताना दिसत आहे. नगरसेवकांच्या गांधीगिरीनंतर कर्मचाऱ्यांचा मुजोरीपणा दिसून येत आहे.  

कर्मचारी कार्यालयीन वेळेत बाहेर जातात, याला विरोध म्हणून येथील एका नगरसेवकाने वेळेचे बंधन पाळण्याचा संदेश देणारे पोस्टर पालिकेतील प्रत्येक विभागाच्या प्रवेशद्वारावर चिकटविण्याची ‘गांधीगिरी’ केली होती. याचा चांगला परिणाम होण्याऐवजी उलटाच परिणाम दिसून येत आहे. नगरसेवकाची ही गांधीगिरी कर्मचाऱ्यांना चांगलीच जिव्हारी लागली असून कर्मचारी कामांना नाही, तर केवळ वेळेला प्राधान्य देत आपली ‘ड्युटी’ करत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. खामगाव नगर पालिकेतील काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत दांडी मारताना आढळून आल्याने नगरसेवक सतिश आप्पा दुडे यांनी नगराध्यक्षा तसेच मुख्याधिकारी यांना लेखी कळविले. यावर मुख्याधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावल्या. तरिही, काहीच फरक पडत नसल्याने नगरसेवक सतिश आप्पा दुडे यांनी अखेर गांधीगिरी करण्याचा निर्णय घेतला. दुडेंनी कार्यालयालीन कामकाजाच्या वेळा तसेच कर्मचारी गैरहजर असल्यास त्याबाबत संपर्क करण्यासाठीचा मोबाईल क्रमांक असलेले पोस्टर नगर पालिकेतील विविध विभागांच्या प्रवेशद्वारावर चिकटविले. कर्मचाऱ्यांना वेळेचे महत्व समजेल व नागरिकांची कामे वेळेवर होतील, हा उद्देश त्यामागे होता. परंतु, या गांधीगिरीचा नकारात्मक परिणाम झाला आहे. पोस्टर लावण्यात आल्यापासून कर्मचारी केवळ वेळेचे बंधन पाळण्यासाठीच डयुटी करताना दिसत आहेत. एरव्ही ड्युटीची वेळ संपल्यानंतरही बराच वेळ नगर पालिकेत थांबणारे कर्मचारी आता पावणेसहा नंतर कार्यालयात थांबत नसल्याचे दिसून येत आहे. 

सर्वांनाच वेठीस धरण्याचा प्रकारप्रत्येक कार्यालयात चांगल्या आणि वाईट मानसिकतेने काम करणारे कर्मचारी असतात. परंतु, अशा एक-दोन कर्मचाऱ्यांसाठी सर्वांनाचा वेठीस धरणे बरोबर नाही. खामगाव नगर पालिकेत नेमके हेच सुरू असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला आहे. 

संघटनाप्रमुख सत्ताधाऱ्यांसोबतनगर पालिकेत कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढणारी न.प. कर्मचारी संघटना आहे. मात्र, या संघटनेचे अध्यक्ष कर्मचाऱ्यांची बाजू मांडण्याऐवजी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असल्याची चर्चाही काही कर्मचाऱ्यांमध्ये आहे. संघटनेचे अध्यक्षच जर कर्मचाऱ्यांसोबत नसतील, तर दाद मागायची तरी कोणाकडे असा प्रश्न अनेक कर्मचाऱ्यांना पडला आहे. 

मुख्याधिकाऱ्यांचे ‘टाईम टू टाईम’ कामकाजवास्तविक पाहता, दांडीबहाद्दर हा शब्दप्रयोग इतर कर्मचाऱ्यांसाठी केला गेला असताना, मुख्याधिकारी यांनीही हे प्रकरण गांभिर्याने घेतल्याचे दिसते. कर्मचाऱ्यांची बाजू म्हणून की काय, मुख्याधिकारीसुध्दा त्यांची ड्युटी आता ‘टाईम टू टाईम’ करीत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाnagaradhyakshaनगराध्यक्ष