शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला अत्यल्प भाव : शेतक-याने नदीपात्रात फेकला कापूस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 01:36 IST

पातुर्डा : अपेक्षेपेक्षा कमी भावाने व्यापाºयाने कापूस मागितल्याने  टाकळी पंच येथील अल्पभूधारक शेतकºयाने तो कापूस चक्क नदीपात्रात टाकून देऊन शासनाविषयी रोष व्यक्त केला. शेतमालाला भाव मिळत नसल्याने कपाशी उत्पादक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्देटाकळी पंच येथील शेतक-याचा शासनाप्रती रोष

लोकमत न्यूज नेटवर्कपातुर्डा : अपेक्षेपेक्षा कमी भावाने व्यापा-याने कापूस मागितल्याने  टाकळी पंच येथील अल्पभूधारक शेतक-याने तो कापूस चक्क नदीपात्रात टाकून देऊन शासनाविषयी रोष व्यक्त केला. शेतमालाला भाव मिळत नसल्याने कपाशी उत्पादक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. कपाशीला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतमाल फेकून देण्याची पाळी शेतक-यांवर येऊ लागली आहे. स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्षात शेतक-यांच्या विदारक स्थितीचे चित्रण या घटनेमुळे समोर आले आहे. पातुर्डा येथून जवळच टाकळी पंच येथील अल्पभूधारक शेतकरी लाला महादेव वानखडे या युवा शेतकºयाकडे दोन एकर शेती टाकळी शिवारात आहे. यावर्षी २ क्विंटल २० किलो कापसाचे पीक निघाले. त्याने आपल्या शेतातील कापूस पातुर्ड्यात विक्रीस आणला, तर व्यापाºयाने त्याचा ३० किलो कापूस अवघ्या दहा रुपये किलो भावात मागितला. सध्या ४,३०० रुपयांच्या आसपास कापसाचे भाव आहेत; मात्र शेवटच्या फरदळ कापूस असल्यास सरसकट तीन ते साडेतीन हजार रुपये भाव आहेत. अशा स्थितीत १० रुपये मातीमोल भावाने कापूस मागितल्याने लाला वानखडे यांनी तो कापूस जनावरांना चाºयासाठी टाकून दिला. कापूस एकाधिकार योजना मोडकळीस निघाल्याने कापूस उत्पादक खासगी व्यापाºयांच्या दावणीला बांधला गेला. काही कापूस शेतकºयाने नदीपात्रात टाकून देऊन रोष व्यक्त केला आहे. 

कपाशीला भाव देण्याची मागणी कपाशीला योग्य भाव मिळत नसल्याने कापूस पीक शेतकºयांना परवडत नसल्याचे दिसून येते. कपाशीची अत्यल्प भावात विक्री करावी लागत आहे. त्यामुळे कपाशीला लागलेला खर्चही भरून निघणे अवघड झाले आहे. कपाशीला शासनाने भाव वाढून द्यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे. 

महागडे बियाणे वापरून प्रचंड मेहनतीने पिकवलेला कापूस १० रुपये भावाने मागितला. कृषिप्रधान देशात अशी शेतमालाची मातीमोल खरेदी हा चिंतेचा विषय आहे. शासनाने कापूस उत्पादकांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे.- लाला वानखडे, शेतकरी, टाकळी पंच. 

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरीbuldhanaबुलडाणा