शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीची लागवड घटली!

By admin | Updated: May 15, 2017 00:10 IST

भूजल पातळी खालावल्याने शेतकऱ्यांनी फिरवली मान्सूनपूर्व लागवडीकडे पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कसोनाळा : सोनाळा परिसरासह संग्रामपूर तालुक्यातील भूजल पातळी खोल गेल्याने विहिरी व कूपनलिकांनी तळ गाठला आहे. पर्यायाने बागायती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लावण्यात येणारे मान्सूनपूर्व कपाशीचे पीक धोक्यात आले. बोटावर मोजण्याइतके शेतकरीच कपाशी लागवड करणार आहेत. त्यामुळे यावर्षी शेतकरी वर्गाची भयावह परिस्थिती आहे. सोनाळा परिसरात तसेच संग्रामपूर तालुक्यात बागायती क्षेत्र आहे. त्यामुळे शेतकरी मे महिन्यात कपाशी पिकाची लागवड करतो. दरवर्षी या भागात बागायतदार शेतकरी वर्ग कपाशीचा पेरा जास्त प्रमाणात करीत असतो. यात मान्सूनपूर्व पेरा हा जास्त असतो. मे महिन्यात कपाशी पिकाची मान्सूनपूर्व लागवड शेतकरी करतात. या पिकासाठी पेरणीपूर्व मशागत व पाण्याचे नियोजन महत्त्वाचे असते. कपाशीची लागवड करण्यापूर्वी स्प्रिंक्लरद्वारे पाणी दिले जाते. सऱ्या काढल्या जातात. विशेष अंतर दोन पऱ्हाटीमध्ये उभे व आडवे ठेवले जाते. नंतर कपाशीची लागवड केली जाते. बिजांकुर उगविण्यासाठी पाण्याचे नियोजन पद्धतशीरपणे करणे महत्त्वपूर्ण आहे. कारण उन्हाळ्याच्या दिवसात पाणी द्यावे लागते. नाहीतर बिजांकुर उगवून कोंब मरु शकतो. पण, यावर्षी संग्रामपूर तालुक्यातील विहिरी व कूपनलिका यांनी तळ गाठला आहे. गेल्या तीन वर्षांपासून पाऊस कमी होत असल्याने गंभीर परिस्थिती उद्भवत आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने मान्सूनपूर्व कपाशीच्या पेरणीचा वांधा झाला आहे. सुरुवातीला स्प्रिंक्लर व नंतर ठिबक सिंचन पद्धतीचा वापर पाणी वाचविण्यासाठी करतात; परंतु काही शेतकऱ्यांजवळ ठिबक सिंचनसुद्धा नाही. एकंदरित शेतकऱ्याचे कंबरडेच मोडले आहे, तर दुसरीकडे निसर्गाने पाठ फिरविली आहे. पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. आजरोजी अंदाजे कूपनलिका २५० ते ३०० फूट खोल गेल्या आहेत व त्यामधून उपसा अल्पशा प्रमाणात राहतो; पण कपाशीला पाणी भरपूर प्रमाणात लागते. बागायती असून, अल्पपाणी असल्यामुळे कपाशी लागवडीसाठी शेतीची पूर्वमशागत होऊन सुद्धा केवळ पाणी नसल्यामुळे कपाशीची लागवड थांबली आहे. मे महिन्यात १० तारखेच्या पुढे लागवड केल्या जाते; परंतु पाणी नसल्यामुळे शेतकरी हतबल ठरत आहे. ज्या शेतकऱ्यांजवळ पाणी आहे ते सुद्धा अल्प प्रमाणात मान्सूनपूर्व कपाशी पेरत आहेत. कारण क्षेत्र जरी जास्त असले, तरी पाणी कमी असल्यामुळे शेतकरी उदासीन होत आहे. दुसरीकडे पाण्याची पातळी खोल जात असल्यामुळे शासनासोबत निसर्गसुद्धा शेतकऱ्यांवर संकटे ओढवित आहे, एवढे मात्र खरे.जलयुक्त शिवारची कामे व ठिबक सिंचनाची गरजसोनाळा परिसरात जलयुक्त शिवारची कामे कमी आहेत. या सातपुडा पर्वताच्या भागात नाले भरपूर प्रमाणात आहेत. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ मोहिमेला भरपूर वाव आहे. परंतु जलयुक्त शिवार योजनेतून झालेली कामे ही नाहीच्या बरोबर आहेत. त्यामुळे पाण्याची पातळी खोल गेल्याचे यावरुन दिसून येते. एकीकडे शासन जलयुक्त शिवाराचा गाजावाजा करते, तर दुसरीकडे या आदिवासी पट्ट्यात कामे कमी आहेत. या भागात शासनाने अनुदानावर बागायतदार शेतकऱ्यांना ठिबक सिंचन द्यावे, अशी मागणी आहे.पाण्याची पातळी खोल गेली आहे. यामुळे थोड्या प्रमाणात विहिरी व बोअर चालतात. परिणामी बागायती शेती करणे कठीण झाले आहे. यामुळे भुईमूग, कांदा तसेच फळबागाचे नुकसान झाले आहे. तर आता कपाशीचे पीक सुद्धा वांध्यात आले आहे.- जगन्नाथ विश्वकर्मा, सधन शेतकरी सोनाळा