शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

 दुष्काळात जगविलेली कपाशी वेधतेय लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 17:35 IST

पाण्याचे नियोजन करत जगविलेली कपाशी खामगाव ते भेंडवळ मार्गाने येणाºया-जाणाºया सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. 

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: सध्या सगळीकडे दुष्काळी परिस्थिती आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने यावर्षी बागायती कपाशीची लागवड नसल्यातच जमा आहे. परंतु अशाही परिस्थितीत माटरगाव परिसरात एका शेतकºयाच्या शेतात कपाशीची रोपे डौलाने उभी आहेत. एकीकडे या परिसरात कोणत्याही शेतात पिक दिसत नसताना ठिबकच्या साह्याने पाण्याचे नियोजन करत जगविलेली कपाशी खामगाव ते भेंडवळ मार्गाने येणाºया-जाणाºया सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. गत चार वर्षांपासून पावसाचे प्रमाण सातत्याने घटत आहे. गतवर्षीची परिस्थती तर अतिशय बिकट होती. अत्यल्प पाऊस पडल्याने जमिनीत पाहिजे त्या प्रमाणात ओल झाली नाही. परिणामी संपूर्ण खरीप हंगाम हातचा गेला. पिके आली नाहीत, सगळीकडे दुष्काळ पडला. नदी-नाल्यांना पूर गेले नसल्याने जलाशये आटली. विहिरी, बोअरवेलला पाणी नाही. याचा परिणाम रब्बी हंगामावरही झाला. सध्याची परिस्थिती तर अतिशय भीषण आहे.  सगळीकडेच तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली. गावा-गावात प्यायला पाणी नाही. जिथे प्यायलाच पाणी नाही; तिथे पिकांचे तर बोलायलाच नको. त्यामुळेच यावर्षी बागायती कपाशीची लागवड नसल्यातच जमा आहे. जिकडे पाहावे तिकडे नांगरलेली शेती दिसून येते. सर्वच जण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ज्यांच्या विहिरींना थोडे-बहूत पाणी आहे, त्यांनीही बागायती कपाशीची लागवड करण्याची हिंम्मत केलेली नाही. बोटावर मोजण्या एवढ्या शेतकºयांनी कपाशी लागवडीचा प्रयोग केलाही असेल; तरीही अद्याप कोण्याच्याही शेतात डोलणारी कपाशीची रोपे, हे चित्र निदान घाटाखाली तरी दुर्मिळच म्हणावे लागेल. असे असले, तरी शेगाव तालुक्यातील माटरगाव ते भास्तन दरम्यान  एका शेतात कपाशीची रोपे डौलाने उभी असल्याचे दिसून येते. माटरगाव येथील गणेश सपकाळ यांच्या शेतातील हे दृष्य असून तब्बल ५ एकर क्षेत्रावर ‘ताशी’ लागलेली ही कपाशी रोडने येणाºया-जाणाºयांचे लक्ष वेधून घेत आहे.

 विहिरीला आहे भरपूर पाणी!एकीकडे अनेक गावांना पिण्यासाठी पाणी मिळत नसताना, माटरगाव येथील गणेश सपकाळ यांच्या विहिरीला सध्याही भरपूर पाणी आहे. त्यांच्या ५ एकर शेतातील कपाशी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत असली, तरी त्यांनी तब्बल १० एकरावर कपाशीची लागवड केली आहे. विहिरीला भरपूर पाणी असल्यानेच हे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे या परिसरात हरणांचा प्रचंड त्रास आहे. संपूर्ण शेतशिवार खाली असताना एकाच शेतात कपाशीची रोपे दिसत असल्याने हरणांचे कळप कपाशी फस्त करतात. त्यामुळे रात्रंदिवस शेतात जागून कपाशी जपावी लागते, असे गणेश सपकाळ सांगतात.

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी