शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कापूस, सोयाबीन पिकांच्या उत्पादनात घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:16 IST

संग्रामपूर: तालुक्यातील एकलारा बानोदा, बावनबीर व एकलारा  या गावात सन २0१७-१८ या खरीप हंगामात अनियमित पाऊस  व कीड रोगराईमुळे सोयाबीन व कापूस या पिकात कमालीची  घट झाली.

ठळक मुद्देपैसेवारी कमी करण्यात यावी शेतकर्‍यांची तहसीलदारांकडे  मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: तालुक्यातील एकलारा बानोदा, बावनबीर व एकलारा  या गावात सन २0१७-१८ या खरीप हंगामात अनियमित पाऊस  व कीड रोगराईमुळे सोयाबीन व कापूस या पिकात कमालीची  घट झाली. त्यामुळे संबंधित विभागाकडून आणेवारी कमी  करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन एकलारा, बावनबीर व  उमरा गावातील शेतकर्‍यांनी तहसीलदार राठोड यांच्याकडे ३0  ऑक्टोबर रोजी दिले.सदर दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, सोयाबीन व कापूस  िपकाच्या उत्पादनात कमालीची घट झाली असून, सोयाबीन प्रति  एकर १ ते २ क्विंटल व कापूस प्रति एकर २ ते ४ क्विंटल एवढे  कमी उत्पादन होत आहे. या पिकाला शेतकर्‍यांना भला मोठा  खर्च आला आहे. कापसाला ३ हजार ते ३ हजार ५00 रुपये व  सोयाबीनला १,५00 ते २,३00 रुपये भाव मिळत आहे. शे तकर्‍यांचा झालेला खर्चसुद्धा वसूल न होण्याची स्थिती निर्माण  झालेली आहे. सदर उत्पादनात झालेल्या घटीमुळे शेतकर्‍यांसमोर फार मोठे  संकट उभे झाले आहे. सोयाबीन सोंगणी १,५00 ते २,000  एकरी व कापूस ७ रुपये ते १0 रुपये प्रतिकिलो अशी मजुरी  द्यावी लागत आहे. सोयाबीन या पिकाचा काढणी खर्चसुद्धा  वसूल होत नसून, शेतकर्‍यांनी पिकात ट्रॅक्टर घातले आहे.  त्यामुळे संबंधित विभागाकडून आणेवारी कमी करण्यात यावी व  सदर पिकांचा सर्व्हे करून शेतकर्‍यांना पीक विम्याची नुकसान  भरपाईची शिफारस करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे  करण्यात आली आहे. 

शेतकर्‍यांना मदत द्या तालुक्यात सोयाबीन व कापूस या पिकांचे उत्पादन कमी झाले  असून, भावसुद्धा मिळेनासा झाला आहे. कमी भावापेक्षा कमी  भावाने खरेदी होत असल्याने शेतकरी पुरता नागवला गेला आहे.  त्यामुळे शासनाने याबाबत सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शे तकर्‍यांना आर्थिक मदतीचा हात देणे गरजेचे बनले आहे. तरी  संबंधित लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन सदर बाबीसाठी  शासनदरबारी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी