शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Washim : कोरोनाने घेतले आणखी सहा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 11:55 IST

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी सहा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद २० सप्टेंबर रोजी घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी सहा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद २० सप्टेंबर रोजी घेण्यात आली. त्यामुळे कोरोनाबळींचा आकडा ६३ वर गेला आहे दुसरीकडे दिवसभरात १५० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांची संख्या ३५५५ वर पोहोचली आहे. दरम्यान रविवारी ९८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या वाढीचा वेग वाढला असून, कोरोनामुळे मृतकांचा आकडाही वाढला आहे. रविवारी आणखी सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. रविवारी दिवसभरात १५० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील सुंदरवाटिका २, शिक्षक कॉलनी परिसर १, लाखाळा परिसर ११, शुक्रवार पेठ ६, सुभाष चौक १, बाहेती गल्ली १, स्त्री रुग्णालय परिसर १, सिंधी कॅम्प १, गोंदेश्वर १, माधव नगर २, नंदिपेठ ११, ध्रुव चौक २, जुनी आययुडीपी १, लोनसुने चौक येथील १, काटीवेस ३, सिव्हील लाईन्स ३, चामुंडादेवी परिसर ३, वाटाणे वाडी १, आनंदवाडी १, विनायक नगर १, पाटणी चौक परिसर १, काळे फाईल १, शहरातील इतर ठिकाणचे ३, बाभुळगाव १, सोयता १, उमरा शमशुद्दीन ४, अनसिंग २, केकतउमरा १५, सेनगाव १, जांभरूण जहांगीर येथील १२, तामसी ५, आसोला १, मोहगव्हाण १, मालेगाव शहरात ९, एरंडा १, अमानी २, डव्हा १, पिंप्री सरहद येथील २, झोडगा २, रिसोड शहरात ११, गणेशपूर ४, चिचांबा पेन येथील २, नेतान्सा १, मांगुळ झनक येथील १, हिवरा पेन येथील २, नंधाना येथील १, केनवड येथील १, रिठद येथील १, कारंजा लाड शहरात २, हिवराळा येथील १, मंगरूळपीर शहरातील ३, शिवणी येथील १ अशा १५० जणांचा समावेश आहे. आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३५५५ झाली असून, यापैकी २६१९ जणांनी कोरोनावर मात केली. आता ८७२ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालय, खासगी कोविड हॉस्पिटल, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू आहेत.

चार महिला, दोन पुरुषांचा मृत्यूजिल्ह्यात कोरोमुळे मृत्यू होणाऱ्यांच्या आकड्यात हळूहळू वाढ होत असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. वाशिम शहरातील चामुंडादेवी परिसरातील ४५ वर्षीय महिला, ब्रह्मा येथील ६९ वर्षीय पुरुष, शिरपुटी येथील ५५ वर्षीय महिला, रिठद (ता. रिसोड) येथील ६५ वर्षीय महिला, सोनखास (ता. मंगरूळपीर), येथील ६७ वर्षीय पुरुष, मालेगाव शहरातील ८५ वर्षीय महिला अशा एकूण सहा जणांच्या मृत्यूची नोंद रविवारी घेण्यात आली. आतापर्यंत एकूण ६३ जणांचे मृत्यू झाले तर एका रुग्णाने आत्महत्या केली.

९८ जणांना डिस्चार्जकोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. रविवारी जिल्ह्यातील ९८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण ३५५५ जण कोरोनाबाधित आढळून आले असून, यापैकी २६१९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

८७२ जणांवर उपचारजिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. सप्टेंबर महिन्यात रुग्णवाढीचा वेग चांगलाच झेपावला आहे. सध्या जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटलमध्ये एकूण ८७२ जण उपचार घेत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या