शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील जनजीवन होतेय सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 10:46 IST

मिशन बिगीन अंतर्गत तिसऱ्या टप्प्यास आठ जून पासून प्रारंभ झाल्यांनंतर बुलडाणा जिल्ह्यात जनजीवन सुरळीततेच्या दिशने जात असल्याचे चित्र दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मिशन बिगीन अंतर्गत तिसऱ्या टप्प्यास आठ जून पासून प्रारंभ झाल्यांनंतर बुलडाणा जिल्ह्यात जनजीवन सुरळीततेच्या दिशने जात असल्याचे चित्र दिसून आले.सोमवारी जिल्ह्यातील बहुतांश बाजारपेठा उघडलेल्या दिसल्या. बुलडाणा, लोणार, मेहकर, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, खामगावसह ग्रामीण भागातही बाजारपेठांमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे जिल्ह्याचे अर्थचक्र गतीमान होण्यास प्रारंभ झाला आहे.अस्थायी विक्रेते, छोटे व्यवसाय करणारे, सराफा दुकानांसमोर पोत ओवून देणाºया आणि अगदी पावसाळयाच्या तोंडावर लोणचे घालण्यासाठी घाईगडबड करणाºया महिलांना दहा रुपये किलो प्रमाणे कैºया फोडून देणारेही बाजारात दिसून आले. त्यामुळे हातावर पोट असलेल्या अनेकांना जवळपास अडीच महिन्यांतर काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसून येत होते. कपड्याची, भांड्याची, मोबाईल शॉपीसह कटलरीची दुकाने बुलडाणा शहरात उघडलेली दिसून आली. बुलडाण्यातील कपडा मार्केट हे प्रसिद्ध आहे. त्यादृष्टीने कोर्ट रोडवर अस्थायी विक्रेत्यांनी तंबूत त्यांची दुकानेही थाटली होती.कोरोनाची धास्ती असली तरी त्याच्या पासून बचावासाठी काय उपाययोजना व्यक्तीगत स्तरावर कराव्यात, याची जाणीवर आता सामान्य व्यक्तीला झाली आहे. त्यामुळे त्याचे पालन करतच अनेकांनी आपले व्यवहार सोमवारी केले. वास्तविक सोमवारी बुलडाण्यातील बहुतांश दुकाने बंद असतात. मात्र प्रदीर्घ कालावधीनंतर आता दुकाने सुरू झाल्याचे चित्र शहरात होते.

व्यापारीही घेताहेत काळजीबाजारपेठांमध्ये आता काही प्रमाणात ग्राहकांचा गलबलाट सुरू झाला आहे. पूर्वीसारखी स्थिती नसली तरी त्या दिशेने आता पावले पडत असल्याचे दिसून आले. सराफा बाजारातही पोथ, मणी ओवणाऱ्यांनी सोन्या, चांदीच्या दुकानासमोर आपली दुकाने थाटली असल्याचे दिसून आले.

धार्मिक स्थळे मात्र अद्यापही बंदजिल्ह्यातील बहुतांश व्यवहार सुरळीत होत असल्याचे दिसून आले तरी बुलडाणा शहरासह जिल्ह्यातील धार्मिक स्थळे अद्याप उघडण्यात आली नाहीत. नॉन रेड झोनमधील बुलडाणा जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभापासूनच अनेक व्यवसाय सुरू झाले होते.

सुरक्षीत शारीरिक अंतर, निर्जंतुकीकरण केल्यानंतरच ग्राहकांना दुकानात घेण्यात येत आहे. पाच पेक्षा अधिक ग्राहक ऐका वेळी दुकानात घेतले जात नाहीत. सोबतच सध्याची सकाळी नऊ ते सायंकाळी पाचची वेळ व्यवसायासाठी पुरेशी आहे. प्रसंगी ती एक तासाने कमी केली तरी चालेले, असे बुलडाणा चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष विजय बाफना यांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक