शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात सात जणांचे 'स्क्रीनींग'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 11:06 IST

एकही कोरोनाचा पॉझिटीव्ह रुग्ण नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा एकही पॉझीटिव्ह रुग्ण नसल्याची माहिती देतांनाच संशयावरून जिल्ह्यातील सात जणांचे स्क्रीनींग आरोग्य विभागाने केले असून सुदैवाची बाबा म्हणजे यात एकही कोरोनाचा पॉझिटीव्ह रुग्ण नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी स्पष्ट केले.शुक्रवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत व डॉ. कुटुंबे यांनी स्थानिक पत्रकार भवनाच्या सभागृहात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरूण जैन आणि राज्य संघटनेचे राजेंद्र काळे प्रामुख्याने उपस्थित होते.बुलडाणा जिल्ह्यात दोन दुबाई, एक इटली, दोन चीन, एक दिल्ली व एक कर्नाटकमधून आलेल्या अशा एकूण सात जणांचे स्क्रीनींग आरोग्य विभागाकडून करण्यात आले असून त्यांना कोरोनाचा कुठलाही प्रादुर्भाव झालेला नाही. रोम (इटली) येथून सहा मार्च रोजी आलेल्या व्यक्तीचेही रिपोर्टर्स नार्मल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांनी पॅनिक न होता प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा, असे आवाहन केले. कोरोनावर उपचार नसले तरी खबरदारी हाच सर्वात मोठा उपचार असल्याचे सांगत या आजाराचा रिस्क पिरेड हा साधारणत: १४ दिवसाचा असल्याचे आतापर्यंतच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सतर्क असून बुलडाणा, शेगाव, खामगाव येथे विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणाही त्यादृष्टीने सक्रीय आहे. उष्ण वातावरणात हा विषाणू फारकाळ टिकाव धरू शकत नाही, त्यामुळे आगामी २० दिवस सर्वांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खबरदारी घेण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. त्यानंतर एका अंदाजनुसार या आजाराचा धोका कमी होईल, असे सांगत साधारणत: ४५ वर्षावरील व्यक्तीं आतापर्यंत या आजारामुळे जगभरात बाधीत झालेल्या आहेत तर या आजाराचा मृत्यू दर हा २.५ टक्के ते तीन टक्के आहे. मात्र अन्य विषाणूपेक्षा या विषाणूचा फैलाव हा वेगाने झाला असल्याचे आतापर्यंत झालेल्या अभ्यासातून स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस