Coronavirus : ‘कोरोना’चा रूग्ण आढळल्याच्या  अफवेने खामगावात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 02:33 PM2020-03-09T14:33:54+5:302020-03-09T14:34:13+5:30

‘कोरोना’चा कोणताही रूग्ण आढळला नसल्याचा खुलासा संबंधित रुग्णालयाने केला.

Coronavirus: rumors of 'coronas' being found in Khamgaon | Coronavirus : ‘कोरोना’चा रूग्ण आढळल्याच्या  अफवेने खामगावात खळबळ

Coronavirus : ‘कोरोना’चा रूग्ण आढळल्याच्या  अफवेने खामगावात खळबळ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव:शहरातील एका नागरिकास ‘कोरोना’या आजाराची लागण झाल्याचा संदेश सोशल मिडीयावर सोमवारी सकाळी व्हायरल झाला. त्यामुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, खात्री करण्यासाठी अनेकांनी संबंधित खासगी रूग्णालयात धाव घेतली. मात्र, ‘कोरोना’चा कोणताही रूग्ण आढळला नसल्याचा तसेच कोणत्याही रूग्णांवर उपचार सुरू नसल्याचा खुलासा संबंधित रुग्णालयाने केला.
 देशात कोरोनाचे ३४ संशयीत रुग्ण आढळून आल्यानंतर सर्वत्र सतर्कता बाळगण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडूनही खबरदारी म्हणून सैलानी येथील यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्याचपार्श्वभूमीवर गर्दी आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षीतता बाळगण्यात येत आहे. दरम्यान, अकोला येथे ‘कोरोना’ या आजाराचा संशयीत रूग्ण आढळून आला. त्यामुळे पश्चिम विदर्भात खळबळ माजली असतानाच, सोमवारी सकाळी खामगावात आणखी एक संशयीत रूग्ण आढळून आल्याचा एक संदेश सोशल मिडीयावर व्हायरल झाला.
 संशयीत रूग्णावर खामगाव येथील एका खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आल्याचेही संदेशात नमूद करण्यात आले. त्यामुळे खामगावात एकच खळबळ उडाली. मात्र, शेवटी खामगावात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याची केवळ अफवाच ठरली. तसेच संदेशात नमूद केले रुग्णाचे नावही फेक असल्याचे आढळून आले.
 
खामगावात ‘कोरोना’चा रूग्ण आढळल्याची केवळ अफवा आहे. सोशल मिडीयावर नमूद नावाच्या कोणत्याही रूग्णावर आमच्या रूग्णालयात उपचार करण्यात आले नाहीत. तसेच कोणत्याही रुग्णाला नागपूर येथे हलविलेले नाही.

- डॉ. भगतसिंह राजपूत
 खामगाव.
(प्रतिनिधी)

Web Title: Coronavirus: rumors of 'coronas' being found in Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.