शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

CoronaVirus : ‘स्वयं मूल्यमापन टेस्ट'ला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 10:59 IST

खामगाव शहरातील सुमारे १४० नागरिकांनी घरबसल्या आरोग्याची खात्री करून घेतली आहे.

- योगेश फरपटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : महाराष्ट्र शासनातर्फे कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अत्यावश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना विषाणूची लागण झाली आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोव्हिड-१९ 'स्वयं मूल्यमापन टेस्ट' सुरु केली आहे. या टेस्टचा जिल्हयातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला आहे. यामध्ये खामगाव्२ा शहरातील सुमारे १४० नागरिकांनी घरबसल्या आरोग्याची खात्री करून घेतली आहे.राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यापैकी कोव्हिड-१९ कोरोनाची 'स्वयं मूल्यमापन टेस्ट' ही एक आहे. मराठी आणि हिंदी भाषेत देखील ही २ मिनिट्स टेस्ट उपलब्ध आहे. नागरिकांनी वेबसाईटवर जावून आपल्या ही टेस्ट करून घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी केले आहे.

ही एकप्रकारे डिजीटल चाचणीच: डॉ. निलेश टापरेजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या मार्गदर्शनात अत्यावश्यक त्या उपाययोजना सामान्य रुग्णालयात करण्यात आल्या आहेत. सध्या कम्युनिटी स्प्रेडचा धोका नसल्याचे दिसून येते. मात्र नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. यासाठी शासनाच्या अधिकृत असलेल्या या बेवसाईटला भेट देवून नागरिकांनी डिजिटल चाचणी करून घेणे गरजेचे आहे. कोरोना विषाणूची लक्षणे ओळखण्याची ही एक सोपी पद्धत आहे. प्रत्येकाने यासाठी पुढाकार घ्यावा. जेणेकरून आपल्या मनातील शंका दूर होईल, असे सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांनी सांगितले.

खात्री कराज्या नागरिकांना ज्या नागरीकांना सर्दी, खोकला आणि तापेचे लक्षण असतील आणि त्यांची ट्रॅव्हलिंग हिस्ट्री असेल असे नागरिक ँ३३स्र२://ूङ्म५्र1ि9.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल जाऊन आपले निदान करू शकतात. सदर लिकवर टेस्ट संदर्भात तुम्हाला काही प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. त्याआधारे आपल्याला कोरोना विषाणू संसर्ग झाला आहे की नाही याची खात्री मिळते. ही वैद्यकीय चाचणी नसली तरी यामाध्यमातून मनातील शंका दूर होते.

 

टॅग्स :khamgaonखामगावCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस