शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Khamgaon :  चितोडा येथील २५ जण क्वारंटीन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 10:31 IST

तर कोरोना पॉझिटीव्ह असलेला रूग्ण खामगाव येथील रूग्णालयात क्वारंटीन आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: तालुक्यातील चितोडा येथील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांचे नातेवाईक आणि शेजाºयांना क्वारंटाईन करण्यात अखेर प्रशासनाला रात्री उशीरा यश आले. चितोडा येथील सुमारे २५ जणांना क्वारंटाईन करण्यासाठी बुलडाणा येथे नेण्यात आले. तर कोरोना पॉझिटीव्ह असलेला रूग्ण खामगाव येथील रूग्णालयात क्वारंटाईन आहे.रविवारी सकाळी बुलडाणा येथून पाठविण्यात आलेल्या स्वाब नमुन्यांपैकी ३ नमुने पॉझिटीव्ह आले. यामध्ये खामगावातील चितोडा येथील एका २३ वर्षीय युवक कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने तालुका प्रशासनात एकच खळबळ उडाली. सकाळी दहा वाजता अहवाल प्राप्त झाल्यानंतर रूग्णालय प्रशासनाने दुपारीच चितोडा हे गाव सिल केले. दरम्यान, तांत्रिक अडचणींमुळे या रूग्णाच्या संपर्कात आलेल्या तब्बल २५ पेक्षा जास्त जणांना क्वारंटाईन करण्यासाठी तालुका आणि आरोग्य प्रशासनाला चांगलीच दमछाक करावी लागली.अखेर रात्री उशीरा चितोडा येथील त्या पॉझिटीव्ह रूग्णाच्या कुटुंबियांसह त्याच्या संपर्कात आलेल्या २५ जणांना क्वारंटाईन करण्यात आले. रूग्णवाहिकांमधून त्यांना बुलडाणा येथे नेण्यात आले.दिल्ली येथील एका धार्मिक स्थळावरून चितोडा येथील हा युवक नुकताच परतला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने त्याचा शोध घेऊन, क्वारंटाईन केले होते. दरम्यान, त्याचा स्वाब नमुना नागपूर येथे पाठविण्यात आला. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर खबरदारी म्हणून त्याचे कुटुंबिय, नातेवाईक आणि संपर्कातील लोकांना प्रशासनाने क्वारंटाईन केले आहे. गावातील नागरिकांची तपासणी!चितोडा येथील एक रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर खामगाव येथील आरोग्य पथक चितोडा येथे धडकले आहे. या गावातील नागरिकांची तपासणी केली जात आहे. रविवारी अनेकांची तपासणी केल्यानंतर सोमवारी पुन्हा आरोग्य पथकाकडून गावातील नागरिकांची तपासणी केली जात आहे.

 गावातील नागरिक भयभित!

गावात कोरोनाचा रूग्ण आढळून आल्यानंतर चितोडा येथील नागरिक चांगलेच भयभित झाले आहेत. गावात कुणीही बाहेर पडणार नाही, याची खबरदारी गावकरी स्वत:च घेत आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावात निर्जंतुकीरण द्रावणाची फवारणी करण्यात आली. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस