CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात आणखी चौघांचा मृत्यू; १३७ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 12:16 PM2020-09-21T12:16:34+5:302020-09-21T12:19:23+5:30

एकाच दिवशी चौघांचा मृत्यू होण्याची जिल्ह्यातील ही दुसरी वेळ आहे.

CoronaVirus: Four killed in Buldana district; 137 Positive | CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात आणखी चौघांचा मृत्यू; १३७ पॉझिटिव्ह

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात आणखी चौघांचा मृत्यू; १३७ पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या सहा हजारांच्या टप्प्यात आली असतानाच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या ही वाढत आहे. रविवारी जिल्ह्यात चार कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी चौघांचा मृत्यू होण्याची जिल्ह्यातील ही दुसरी वेळ आहे. दुसरीकडे रविवारी १३७ जण कोरोना बाधीत आढळून आले आहे तर १४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये चिखली येथील ५६ वर्षी व्यक्ती, मेहकर येथील ५० वर्षाच्या व्यक्तीसह मलकापूर तालुक्यातील झोडगा येथील ७० वर्षीय महिला व जालना जिल्ह्यातील टेंभूर्णी येथील ६० वर्षीय महिलेचा यात समावेश आहे. दरम्यान, रविवारी प्रयोगशाळेतून आणि रॅपीड टेस्ट केलेल्यांपैकी ४५० जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३१३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर १३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये खामगाव २५, बोर जवळा पाच, जळका भडंग दोन, शेगाव ११, पहुरजीरा एक, माटरगाव दोन, देऊळगाव राजा सहा, सुलतानपूर दोन, मलकापूर चार, झोडगा तीन, हिंगणा काझी एक, दाताळा एक, धामणगाव बढे तीन, शेलापूर बुद्रूक एक, खेडी चार, मोताला एक, चिखली १२, मोहनखेड एक, अजिसपूर एक, अंत्री एक, सागवन दोन, बुलडाणा शहर चार, नांदुरा १६, वरोडी चार, आंबेवाडी एक, जानेफळ एक, डोणगाव तीन, देऊळगाव साकर्शा एक, धाराशीव एक, लोणार एक, बानखेड सहा, देऊळगाव घुबे एक, मेरा बुद्रूक एक, सिंदखेड राजा एक, कवठळ एक आणि अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथील एक या प्रमाणे १३७ जण कोरोना बाधीत आढळून आले. तर चार कोरोना बाधीतांचा २० सप्टेंबर रोजी मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे १४७ जणांनी रविवारी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये सिंदखेड राजा कोवीड सेंटरमधील सहा, मलकापूरमधील दोन, मेहकरमधील तीन, संग्रामपूरमधील चार, लोणारमधील तीन, शेगाव १५, जळगावजामोद १५, नांदुरा तीन, देऊळगाव राजा तीन, खामगाव ५४ आणि बुलडाणा ३९ या प्रमाणे बाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण बाधितांपैकी ४,६४५ जण कोरोना मुक्त झाले आहेत.

Web Title: CoronaVirus: Four killed in Buldana district; 137 Positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.