शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : ‘चायनिज’च्या खवय्यांमध्ये ‘कोरोना’ची भीती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:43 IST

चायनिज’ पदार्थ खाणाऱ्यांमध्ये कोरोनाची भिती असल्याने २० टक्क्याने ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ‘कोरोना’ व्हायरसची सध्या सर्वत्र दहशत निर्माण झाली आहे. चायनिज पदार्थांकडेही खव्वय्यांचा ओढा कमी झालेला आहे. ‘चायनिज’ पदार्थ खाणाऱ्यांमध्ये कोरोनाची भिती असल्याने २० टक्क्याने ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे. सध्या चिनी माल आणि चायनिज पदार्थ विक्रीवर होणाºया लाखो रुपयांच्या उलाढालीवर परिणाम झाला आहे.जिभेचे चोचले पुरविण्यासाठी प्रत्येकजण चायनिज सेंटर गाठतो. चायजिन खाणाऱ्यांची संख्या वाढल्याने प्रत्येक शहरात चायनिज पदार्थाची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. यातून दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल होते. परंतू चायनिज पदार्थांच्या या विक्रीला ‘कोरोना’ विषाणूमुळे मोठा फटका बसला आहे. सतत गजबजणारी चौपाटी कोरोनाच्या भितीमुळे शांत झाली आहे.कोरोना व्हायरसची दहशत पसरल्यापासून चायनिज पदार्थ खाणाºया ग्राहकांची संख्या २० टक्क्याने कमी झाली आहे. चीनमध्ये तयार होणारी चिली बिन पेस्ट आणि तिथून येणारे काही मसाले तुम्ही चायनिजमध्ये वापरता का? असे अनेक प्रश्न ग्राहक चायनिज सेंटर चालकांना विचारत आहेत. चायनिज पदार्थ खाल्ल्याने त्यांनाही कोरोना व्हायरसची लागण होईल, या भितीने काही दिवस चायनिज न खाल्लेलेच बरे, अशी सावधगिरीची भूमिका ग्राहक आता बाळगत आहेत. हॉटेल्समध्येही चायनिज मागणाºयांची संख्या कमी झाल्याचे एका विक्रेत्याने सांगितले.

चायनिज पदार्थांकडे पाहिले जाते संशयानेचायनिज पदार्थामध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट, शेजवान सॉस, कृत्रिम रंग, स्टार्च कॉर्न यांसारखे जिन्नस वापरल्यामुळे पचनशक्तीवर ताण येऊन ती बिघडू शकते. चायनिजच्या प्रत्येक पदार्थामध्ये सॉस असतो. नेमका हा सॉस चीनमधून येतो की इतर कोठून असा प्रश्न ग्राहकांमध्ये आहे. त्यामुळे सध्या कोरोनाच्या भितीमुळे चायजिन पदार्थांकडे ग्राहक संशयाने बघत आहेत.बुलडाण्यात जळगाव खांदेशचा ‘सॉस’चायनिज सेंटरवर मिळणारे नुडल्स, वेगवेगळे राईस, सोया चिली, मन्चुरीयन, ड्रॅगन फुट्स अशा वेगवेगळ्या पदार्थामध्ये ‘सॉस’ हा महत्त्वाचा घटक असतो. परंतू बुलडाण्यामध्ये जळगाव खांदेशमधून सॉस आणला जात असल्याची माहिती एका विक्रेत्याने दिली.

चायनिज सेंटरवर तयार होणारे पदार्थ हे आपल्याच येथे तयार केले जातात, त्यामुळे त्याची भिती बाळगण्याचे काही कारण नाही. परंतू ‘हाफ फ्राय’ असलेले पदार्थ खाणे किंवा कमी शिजवलेले पदार्थ खाऊ नये.- डॉ. बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbuldhanaबुलडाणा