शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : मुंबईहून परतलेली आठ वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 10:38 IST

पांग्रा येथे मुंबईवरून आलेल्या एका कुटुंबातील आठ वर्षीय मुलगी ही कोरोना पॉझीटीव्ह आढळून आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर पांग्रा: सिंदखेड राजा तालु्क्यातील मलकापूर पांग्रा येथे मुंबईवरून आलेल्या एका कुटुंबातील आठ वर्षीय मुलगी ही कोरोना पॉझीटीव्ह आढळून आली आहे. त्यामुळे मलकापूर पांग्रा गट ग्रामपंचायतीमधील पांग्रा हे गाव सील करण्यात आले आहे. सोबतच या मुलीच्या संपर्कात आलेल्या २१ जणांना क्वारंटीन करण्यात येवून त्यांना बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे.कोरोना संसर्ग झालेली मुलगी ही किडनीच्या आजाराने ग्रस्त असून १३ मे रोजी या मुलीसह तिचे कुटूंब हे मुंबईतील एका मोठ्या रुग्णालयातून मलकापूर पांग्रा या त्यांच्या गावी पोहोचले होते. ११ मे रोजी आजारी मुलगी ही उपचार घेत असलेल्या त्या रुग्णालयात तिचा स्वॅब घेण्यात आला होता. दरम्यान, तिचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली. संबंधीत रुग्णालयाकडून बुलडाणा जिल्ह्यात याची माहिती देण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली. सध्या मलकापूर पांग्रा गाव सील करण्यात येऊन परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.कोरोना पॉझीटीव्ह आलेली मुलगी ही आठ वर्षाची असून किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे. १२ मार्च रोजी तिला तिचे कुटुंबिय मुंबईतील एका मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले होते. तेथून ते १३ मे रोजी परत पांग्रा येथे आले.२,५६४ नागरिकांची होणार तपासणी मलकापूर पांग्रा ही गट ग्रामपंचायत असून पांग्रा गावाची लोकसंख्या ही सुमारे २,५६४ च्या आसपास आहे. त्यामुुळे हे क्षेत्र आता प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून ४९६ घरातील नागरिकांची आगामी १४ दिवस दहा आरोग्य पथकाद्वारे नियमित तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोना संसर्ग झालेली मुलगी व तिच्या कुटुंबियांना बुलडाणा येथील कोवीड रुग्णालयात हलविण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.२१ जण क्वारंटीनमलकापूर पांग्रा येथील या मुलीच्या व तिच्या कुटुंबियांच्या संपर्कात आलेले १९ जण व पळसखेड झाल्टा येथील दोघा जणांना आरोग्य विभागाने क्वारंटीन केले आहे. यातील हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेल्यांना बुलडाणा येथील कोवीड रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अन्य व्यक्तींना गावातच होम क्वारंटीन करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

 

टॅग्स :Malkapurमलकापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या