शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

CoronaVirus : कोरोनामुक्त रुग्ण म्हणाला, ‘डर के आगे जीत है...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 11:31 IST

सर्व डॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीमुळे मी कोरोना या जीवघेण्या आजारातून बाहेर पडलोे.

ठळक मुद्देकोरोनामुक्त व्यक्तीशी ‘लोकमत’ने संवाद साधला. त्यांनी रुग्णालयातील १८ दिवसांचा प्रवास उलगडला.इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी माझे स्वागत केले, अशी माहिती देत कोरोनामुक्त व्यक्तीने समाधान व्यक्त केले.

- मनोज पाटील  लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: शुरूवात को मनमें थोडासा डर था... लेकीन मुझे पता था की, डर के आगे जीत है.... यहॉ के डॉक्टर और नर्सने उपचार के दरम्यान बहोत सहकार्य किया... इसलिये मै शायद आज मौत से लडकर वापस आया हू... अभी ठीक होने के बाद बहुत अच्छा लग रहा है... इसलिये खुश हू... अशा समाधानकारक भावना मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या शहरातील ५० वर्षीय कोरोनामुक्त रुग्णाने व्यक्त केली.मलकापूर शहरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. बुलडाणा कोविड रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होता. या उपचारानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना २५ एप्रिल रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. घरी आल्यावर २६ एप्रिल रोजी या कोरोनामुक्त व्यक्तीशी ‘लोकमत’ने संवाद साधला. भ्रमणध्वनीवरून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. या संवादादरम्यान त्यांनी रुग्णालयातील १८ दिवसांचा प्रवास उलगडला. सुख-दु:ख मानवी जीवनाच्या दोन बाजू आहेत. जीवन जगताना आप्तेष्टांशी नाते संबंध प्रत्येकालाच जपावे लागतात. अशा वेळी परिस्थिती बिकट होऊन अडचणीही येतात. त्या सांगून येत नाहीत. तशीच अडचण मला आली. अर्थात न कळणारी. त्यामुळे मला कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे लागले, तेव्हा कुठे तरी मनात अनामिक भीती निर्माण झालेली होती; पण मी मनात भीतीचा बाऊ होऊ दिला नाही. प्रबळ इच्छाशक्तीने जे होईल ते होईल; पण प्रशासनाला सहकार्य करून उपचार करायचाच असा दृढनिश्चय केला. प्रशासनानेही मला धीर दिला.सर्व डॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीमुळे मी कोरोना या जीवघेण्या आजारातून बाहेर पडलोे. त्यामुळे मी त्यांचा मनापासून आभारी आहे. साक्षात मृत्यूशी झूंज देऊन मी परत येतोय ही माझ्यासह माझ्या आप्तेष्टांकरिता आनंदाची बाब आहे. बुलडाणा येथील कोविड रुग्णालयातील चमूने सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काळजी घेतली. आजारातून पूर्णपणे बरे झाल्यावर जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यासह उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून मला सुटी दिली. मलकापूर शहरात पोहोचताच उपविभागीय अधिकारी सुनील विंचनकर, तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नाफडे, नायब तहसीलदार प्रवीण घोटकर यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी माझे स्वागत केले, अशी माहिती देत कोरोनामुक्त व्यक्तीने समाधान व्यक्त केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMalkapurमलकापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या