शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana : आणखी दोघांचे नमुने पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 10:36 IST

यामध्ये ६५ वर्षीय वृद्ध आणि १२ वर्षीय मुलीचा समावेश आहे.

ठळक मुद्देबुलडाणा येथील एका ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू शनिवारी झाला होता.त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या जवळपास ६६ जणांना सध्या मॉनिटरिंग करण्यात येत आहे. ३० जणांचे स्वॅब नमुने हे नागपूर येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

बुलढाणा: दोन दिवसापूर्वी बुलढाणा शहरात कोरोना विषाणूच्या संसर्गाने मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील आणखी दोघांचे तपासणी अहवाल कोरोना पॉझीटिव्ह आले आहेत. बुलडाण्यातील कोरोना बाधीतांची संख्या आता एक मृतकासह ३ झाली आहे. यामध्ये ६५ वर्षीय वृद्ध आणि १२ वर्षीय मुलीचा समावेश आहे. यामुळे बुलडाणा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.बुलडाणा येथील एका ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू शनिवारी झाला होता. या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांसह त्याच्या संपर्कात आलेल्या जवळपास ६६ जणांना सध्या मॉनिटरिंग करण्यात येत आहे. यापैकी बत्तीस जणांचे नमुने तपासणीसाठी ३० मार्च रोजी पाठवण्यात आले होते. त्यातील दोघांचे नमुने हे पॉझिटिव्ह आले आहेत.कोरोना संसर्गामुळे बुलडाण्यात एकाचा मृत्यू झाल्यामुळे बुलडाणा शहर परिसरात कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड (समुह संक्रमाण) होण्याचा धोका वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर बुलडाण्यात नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी जवळपास ४० पथके नियुक्त करण्यात आले असून हाय रिस्क झोनमधील नागरिकांच्या घरोघरी जावून ही तपासणी करण्यात येत आहे. सोबतच मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींवर ही वैद्यकीय सुरक्षेच्या दृष्टीने पाळत (सर्व्हीलन्स) ठेवणे सुरू केले आहे. दरम्यान, २९ मार्च रोजी मृत पावलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना पोलिस, आरोग्य व महसूल प्रशासनाने कोंबींग आॅपरेशन करून ताब्यात घेत बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील हॉस्पीटल क्वारंटीन कक्षात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये तब्बल ६६ जणांचा समावेश असून त्यापैकी ३० जणांचे स्वॅब नमुने हे नागपूर येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यासोबतच काहींचे स्क्रीनींगही करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त मृत व्यक्ती किती जणांच्या संपर्कात होती याचीही माहिती काढण्यात येत आहे.

 

 

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbuldhanaबुलडाणा