शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

CoronaVirus in Buldhana : आणखी २० जणांचे 'स्वॅब' नमुने पाठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 17:33 IST

जवळपास २० जणांचे स्वॅब नमुने हे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

बुलडाणा: विदर्भात नागपूरनंतर बुलडाणा जिल्हा कोरोना संसर्गाच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरत आहे. दरम्यान, १४ एप्रिल रोजी पॉझीटीव्ह आढळलेल्या चौघांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील जवळपास २० जणांचे स्वॅब नमुने हे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान जिल्ह्यातील नागरी भागात राहणाऱ्या सहा लाख लोकसंख्येला घरपोच अत्यावश्यक सेवा पुरविण्याचे नियोजन प्रशासकीय पातळीवर सुरू असून प्रसंगी त्यासंदर्भातील संकेतस्थळ हे १६ एप्रिल रोजी कार्यान्वीत होईल, अशी माहिती प्राप्त झाली आहे.बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ही २१ वर पोहोचली असून बुलडाणा शहरात सहा (मृत्यू एक) आणि मलकापूरमध्ये चार या प्रमाणे कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती आहे. त्या खोलोखाल शेगाव तीन, चिखली तीन तर देऊळगाव राजा आणि खामगाव येथे प्रत्येकी दोन व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ह आहेत. सिंदखेड राजा येथे एका व्यक्तीला कोरोनाची लागन झालेली आहे. परिणामी जिल्हा प्रशासन सध्या अलर्टवर असून हायरिस्क झोनमध्ये राहणाºया ६० हजार २६१ नागरिकांची दररोज वैद्यकीय तपासणी व विचारपूस करण्यात येत आहे.दरम्यान १५ एप्रिल रोजी बुलडाणा जिल्ह्यातून २० जणांचे स्वॅब नमुने पाठविण्यात आले आहेत. यामध्ये मलकापूर येथील पॉझीटीव्ह आलेल्या तीन व बुलडाणा येथील पॉझीटीव्ह आलेल्या ५१ वर्षीय व्यक्तीच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींचा समावेश आहे. यातील मलकापूर येथील ४२ वर्षीय व्यक्ती हा प्रारंभी पॉझीटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या घरापासून बराच दुर राहत असल्याने त्याच्या संपर्कातील काही व्यक्तींचा यात समावेश आहे. सोबतच बुलडाणा येथील व्यक्तीच्याही संपर्कातील काहींना क्वारंटीन करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दुसरीकडे काल पाठविलेल्या १२ स्वॅब नमुन्यांपैकी पाच नमुन्यांचे अहवाल हे निगेटीव्ह आलेले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील पालिका क्षेत्रामध्ये घरपोच अत्यावश्यक सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन केले असून साडेपाच लाख ते सहा लाखांच्या आसपास असलेल्या लोकसंख्येला त्याचा लाभ होईल.'त्या' चौघांची आयसोलेशन कक्षात रवानगी१४ एप्रिल रोजी पॉझीटीव्ह आलेल्या चौघाही जणांची आयसोलेशन कक्षात रवानगी करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या आयसोलेशन कक्षात (अलगीकरण कक्ष) एकूण ३१ व्यक्ती असून यात बुलडाणा येथे २६, खागावमध्ये तीन आणि शेगाव येथे दोन व्यक्तींना आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आलेले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस