शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana : रुग्ण वाढल्याने समूह संक्रमणाचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 17:25 IST

जिल्ह्यात कोरोनाचे समूह संक्रमण (कम्युनिटी स्प्रेड) होण्याचा धोक अधिक वाढला आहे. 

ठळक मुद्दे४ एप्रिलपर्यंत कोरोना बाधीत रुग्ण केवळ बुलडाणा शहरातच होते.चिखली, देऊळगाव राजा आणि खामगाव तालुक्यातील चितोडा याठिकाणीही कोरोना पोहचल्याने जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात कोरोनाचा शिरकाव होत आहे.कोरोना संसर्गाचा विळखा बुलडाणा जिल्ह्यात पडत असल्याचे स्पष्ट होत आहे.

बुलडाणा : सर्वत्र थैमान घालणाºया कोरोना विषाणूने बुलडाणा शहरापाठोपाठ आता जिल्ह्यातही हातपाय पसरण्यास सुरूवात झाली आहे.  जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा नऊवर पोहचला असल्याने बुलडाणा, खामगाव, चिखली व देऊळगाव राजासह इतर शहरातील नागरिकांमध्येही धास्ती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचे समूह संक्रमण (कम्युनिटी स्प्रेड) होण्याचा धोक अधिक वाढला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या गेल्या आठवड्यापासून सातत्याने वाढत आहे. ४ एप्रिलपर्यंत कोरोना बाधीत रुग्ण केवळ बुलडाणा शहरातच होते; परंतू ५ एप्रिल रोजी जिल्ह्यातील चार रुग्ण कोरोना कोरोना पॉझिटिव्ह आढळले. चिखली, देऊळगाव राजा आणि खामगाव तालुक्यातील चितोडा याठिकाणीही कोरोना पोहचल्याने जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात कोरोनाचा शिरकाव होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचे समूह संक्रमण (कम्युनिटी स्प्रेड) होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यानुषंगानेच जिल्ह्यातील प्रत्येक शहरात आरोग्य विभागाने सर्व्हीलन्स (पाळत ठेवणे) सुरू केले आहे.  ज्या भागात रुग्ण सापडले त्याठिकाणचा परिसर सील करण्यात आला आहे. चिखली शहरातील दोन रुग्ण पॉझीटीव्ह आल्याने शहरातील हायरिस्क झोन भाग सील करण्यात आला असून संपूर्ण शहरात सर्वत्र नाकेबंदी करण्यात आली आहे. त्यासंदर्भात उपविभागीय अधिकाºयांनी तसा आदेशही काढला आहे. त्यामुळे आगामी काळात बुलडाणा जिल्ह्याची चिंता वाढली असून कोरोना संसर्गाचा विळखा बुलडाणा जिल्ह्यात पडत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील पोलीस यंत्रणाही अलर्ट झाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस