शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात आणखी चार पॉझीटीव्ह; संख्या २१ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 16:00 IST

मलकापूर येथील व्यक्तीच्या हायरिस्क संपर्कातील तिघांचा तर बुलडाण्यातील एकाचा यात समावेश आहे.

ठळक मुद्देतीनही जण हे मलकापूरमधील रुग्णाच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील आहेत.एक जण बुलडाण्यातील असून तो नेमका कोण आहे हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या ही २१ झाली आहे.

बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली असून १४ एप्रिल रोजी चौघांचे  नमुने पॉझीटीव्ह आले आहे. दरम्यान, या मध्ये मलकापूर येथील व्यक्तीच्या हायरिस्क संपर्कातील तिघांचा तर बुलडाण्यातील एकाचा यात समावेश आहे.परिणामी बुलडाणा जिल्ह्याची चिंता आता वाढली आहे. मलकापूर येथे दहा एप्रिल रोजी एक व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ह आढळला होता. त्याच्या संपर्कातील आणखी तीन जण पॉझीटीव्ह आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. पॉझीटीव्ह आलेले तीनही जण हे मलकापूरमधील रुग्णाच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील आहेत. दरम्यान, एक जण बुलडाण्यातील असून तो नेमका कोण आहे हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे बुलडाणा  जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या ही २१ झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सात तालुक्यामध्ये सध्या कोरोना संसर्ग झालेले व्यक्ती आढळून आले आहेत. त्यामुळे या सातही तालुक्यांच्या  सीमा सील करण्यात आल्या आहेत. यामध्ये मलकापूर, खामगाव, शेगाव, बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा तालुक्यांचा समावेश आहे. प्रत्यक्ष खामगाव शहरात कोरोना संसर्ग झालेला व्यक्ती आढळला नसला तरी खामगाव पासून अवघ्या १२ किमी अंतरावर असलेल्या चितोडा गावातील एक व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ह आहे. अन्य व्यक्ती हे मलकापूर, शेगाव, बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा येथील आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस