शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana :  समूह संक्रमण सुरू झाल्याची भीती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 11:31 IST

जिल्ह्यात ८१४ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून तेथे चार हजार ७७ नागरिकांना क्वारंटीन केल्या जाऊ शकते.

- नीलेश जोशी  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्गाने मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या निकटवर्तीयांचे आरोग्य विभाग मॉनिटरींग करत असून हाय रिस्क झोनमध्ये मोडणाऱ्या बुलडाणा शहरातील ईशान्य भागात प्रामुख्याने आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे सध्या तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे.दरम्यान, कोरोना संसर्गाच्या मृत्यूमुळे आता बुलडाणा शहर परिसरात कोरोना विषाणूचे समुह संक्रमण होण्याची भीती वाढली आहे. त्यामुळे प्रशासन ही अलर्ट मोडवर आहे. पोलिस प्रशासनानेही शहराची चारही बाजूंनी नाकेबंदी केली असून मृत व्यक्ती गेल्या १५ ते २० दिवसात कोणाच्या संपर्कात आला होता तथा त्याला भेटावयास गेलेल्या नागरिकांचीही माहिती काढण्यात गुंतला असल्याचे चित्र ३० मार्च रोजी दिसून आले.बुलडाणा जिल्ह्यात आगामी काळातील संभाव्य धोका पाहता जिल्हा प्रशासनाने प्रसंगी संशयीत व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर क्वारंटीन करण्याची गरज पडल्यास जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांसह काही संस्थांच्या जागांची निवड केली असून त्या ठिकाणी नागरिकांना ठेवण्याच्या दृष्टीने सज्जता केली आहे. अशी जिल्ह्यात ८१४ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून तेथे चार हजार ७७ नागरिकांना क्वारंटीन केल्या जाऊ शकते. दरम्यान, बुलडाणा शहरात सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेदरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू असून तीन नंतर पोलिस प्रशासन या सेवा बंद करण्यासाठी थेट संबंधीतांच्या दुकानावर जात आहे. उद्घोषकाद्वारेही जाहीर आवाहन करून नागरिकांना त्याबाबत समज दिल्या जात आहे.बुलडाण्यातील मृत्यूमूळे समूह संक्रमण सुरू झाल्याची भीतीबुलडाणा शहरात कोरोनाचे समूह संक्रमण (कम्युनिटी स्प्रेड) होण्याची भिती निर्माण झाली आहे. मात्र काही नागरिक अद्यापही याबाबत गंभीर नसल्याचे चित्र ३० मार्च रोजी बुलडाणा शहरात दिसून आले. त्यानुषंगानेच बुलडाणा शहरात आरोग्य विभागाने सर्व्हीलन्स (पाळत ठेवणे) सुरू केले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी दिली. सध्या नागरिकांची तपासणी सुरू असून रात्री उशिरा त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शहरातील एकंदरीत स्थितीचे गांभिर्य निदर्शनास येऊ शकले.दोन डॉक्टरांचेही स्वॅब नमुने पाठवले!शहरातील एकंदर परिस्थिती पाहता सध्या शासकीय कार्यालयांमध्ये रक्तदान शिबीर घेण्यात येत आहे. त्यामुळे काही डॉक्टरांचा सार्वजनिकस्तरावर संपर्क येत आहे. प्रसंगी हे डॉक्टर कोरोना विषाणूचे वाहक होऊ शकतात. त्यानुषंगाने खबरदारी म्हणून दोन डॉक्टरांचेही स्वॅब नमुने ही नागपूर येथे प्रयोग शाळेत तपाणीसाठी पाठवले आहेत.

बुलडाणा शहरात आरोग्य विभागाच्या पथकांद्वारे सर्व्हीलंस सुरू करण्यात आले आहे. कम्युनिटी स्प्रेडचा धोका पाहता उपाययोजना हाती घेण्यात आला आहे. रात्री उशिरा दिवस शहरात करण्यात आलेल्या तपासण्याच्या अहवालाअंती काही बाबी स्पष्ट होऊ शकतात.डॉ. प्रेमचंद पंडीत, जिल्हा शल्यचिकित्स बुलडाणा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbuldhanaबुलडाणा