CoronaVirus in Buldhana : एकाचा मृत्यू; ५९ पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 10:56 AM2020-08-01T10:56:41+5:302020-08-01T10:56:52+5:30

खामगाव येथे एकाचा मृत्यू झाला असून, ५९ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

CoronaVirus in Buldhana: death of one; 59 Positive! | CoronaVirus in Buldhana : एकाचा मृत्यू; ५९ पॉझिटिव्ह!

CoronaVirus in Buldhana : एकाचा मृत्यू; ५९ पॉझिटिव्ह!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात शुक्रवारी आणखी एकाचा खामगाव येथे मृत्यू झाला असून, ५९ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालापैकी ५२१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ३० जणांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी प्रयोगशाळेत एकूण ५८० जणांची तपासणी करण्यात आली. त्यात ५२१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर ५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात प्रयोगशाळेतील तपासणीमध्ये ३५ व रॅपीड टेस्टमध्ये २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये डोणगाव येथे दोन, मेहकर येथे चार, सिंदखेड राजा तालुक्यातील वारूडी येथे एक, बुलडाण्या नजीकच्या सागवन येथे एक, दाताळा येथे दोन, मोताळ््यातील खरबडी येथे एक, नांदुरा येथे दोन, चांदुर बिस्वामध्ये सात, वरवट बकाल येथे एक, पातुर्ड्यामध्ये दोन, माकोडी येथे चार, अंचरवाडी येथेही चार, खामगावमध्ये तीन, बुलडाणा येथे एक, येळगाव येथे ेएक, लकडगंज, आठवडी बाजार येथे प्रत्येकी एक, शेगाव येथे चार, साखरखेर्डा येथे चार, जळगाव जामोद येथे एक, देऊळगाव राजामध्ये पाच जण पॉझिटिव्ह आले आहेत. पैकी एक जण हा जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील रहिवाशी आहे. दरम्यान, असोला येथे सहा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान, खामगावमधील देशमुख प्लॉट परिसरातील ७२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. खामगाव येथील कोवीड रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, आतापर्यंत आठ हजार ९१५ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ७८७ कोरोना बाधीत व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. अद्यापही २१० अहवालांची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधीतांची संख्या एक हजार २६८ झाली असून प्रत्यक्षात ४५१ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.


शुक्रवारी ४३ जणांना रुग्णालयातून सुटी
शुक्रवारी ४३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने मेहकर तालुक्यातील अंजनी येथील तीन, खामगावमधील १४, नांदुरा खुर्द येथील एक, चिखलीमधील नऊ, पिंपळगाव राजा येथील पाच, लोणी गवळी येथील आठ, डोणगाव येथील एक, मेहकरमधील एका जणाचा समावेश आहे. कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही आता जिल्ह्यात वाढत असल्याचे समाधानकारक चित्र आहे

Web Title: CoronaVirus in Buldhana: death of one; 59 Positive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.