CoronaVirus in Buldhana : आणखी एकाचा मृत्यू; ८९ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 07:34 PM2020-09-10T19:34:40+5:302020-09-10T19:35:03+5:30

८९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर ३४५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

CoronaVirus in Buldhana: Death of another; 89 new positives | CoronaVirus in Buldhana : आणखी एकाचा मृत्यू; ८९ नवे पॉझिटिव्ह

CoronaVirus in Buldhana : आणखी एकाचा मृत्यू; ८९ नवे पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गेल्या तीन दिवसापासून सातत्याने दीडशे पेक्षा अधीक कोरोना बाधीत रुग्ण आढळणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यासाठी तुलनेने गुरूवार सुखावह ठरला असून गुरूवारी ८९ जण कोरोना बाधीत आढळून आले आहे. असे असले तरी खामगावमधील एका ८३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यान कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६१ झाली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेले व रॅपीड टेस्ट केलेल्यांपैकी ४३४ जणांचे अहवाल प्राप्त गुरूवारी प्राप्त झाले.
यापैकी ८९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर ३४५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालांपैकी १७० तर रॅपीड टेस्टमध्ये १७५ जणांचा अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
  पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये खामगाव शहरात १५, लाखनवाडा एक, देऊळगाव राजा दोन, गारगुंडी एक, बुलडाणा चार, कोलवड एक, केसापूर एक, भादोला तीन, चिखली दोन, वरूड एक, मलकापूर १७, दाताळा, धानोरा एक, विवरा एक, मेहकर तीन, कळंबेश्वर एक, बायगाव सात, तांबोळा तीन, सुलतानपूर एक, नांदुरा दोन, खेर्डा एक, हिवरा गडलिंग दोन, करवंड एक, जांभोरा तीन, शेंदुर्जन दोन, साखरखेर्डा दोन राजेगाव एक, सि. राजा एक, वरवट बकाल एक, बोडखा एक, पिंपळगाव देवी एक, धा. बढे एक, वडनेर एक, शेलगाव मुकुंद एक, निमगाव एक याप्रमाणे ८९ कोरोना बाधीत आढळून आले आहेत. दुसरीकडे खामगाव शहरातील तलाव रोड भागातील ८३ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान जिल्ह्यातील २१ हजार ८८४ संदिग्ध रुग्णांचे अहवाल आतापर्यंत निगेटीव्ह आले आहेत तर ३,१९२ कोरोनाबादीत रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. कोरोना बाधीतांचा आकडा ४,४५२ वर पोहोचला आहे.


९५ जणांची कोरोनावर मात
गुरूवारी बाधीत रुग्णांपैकी ९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये जवळखेडा येथील एक, शेगावमधील एक, नांदुरा दोन, मलकापूर नऊ, खामगाव १२, चिखली २०, आंधई एक, शेगाव आटोळ दोन, अंत्री खेडेकर एक, दुसरबीड एक, बुलडाणा नऊ, धाड दोन, सागवन ७, वानखेड एक, नायगाव तीन , निमगाव चार, सिंदकेड राजा १३, अनुराबाद एक, मेहकर एक, सुलतानपूर दोन, उटी एक याप्रमाणे कोरोनाबाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Web Title: CoronaVirus in Buldhana: Death of another; 89 new positives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.