CoronaVirus in Buldhana : आणखी एकाचा मृत्यू, १०३ पॉझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 10:43 AM2020-09-22T10:43:02+5:302020-09-22T10:43:11+5:30

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे ७५ जणांचा मृत्यू झाला आहे.

CoronaVirus in Buldhana: Another dies, 103 positive | CoronaVirus in Buldhana : आणखी एकाचा मृत्यू, १०३ पॉझिटीव्ह

CoronaVirus in Buldhana : आणखी एकाचा मृत्यू, १०३ पॉझिटीव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून सोमवारी आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच १०३ संदिग्ध रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून ८१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच ४३४ अहवाल निगेटीव्ह आले आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्या ५ हजार ९५१वर पोहचली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे ७५ जणांचा मृत्यू झाला आहे.
देउळगाव राजा येथील जुना जालना रोड परिसरातील ७६ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.तसेच खामगांव शहरातील ३०, खामगांव तालुक्यातील अटाळी तीन , शिर्ला नेमाने एक, नांदुरा तालुक्यातील निमगांव एक, जळगांव जामोद शहरातील ११ , मोताळा शहरातील एक , मोताळा तालुक्यातील खेडी चार, लोणार तालुक्यातील सावरगांव मुंढे एक, मांडवा दोन, किन्ही दोन, चिखली शहरातील पाच , चिखली तालुक्यातील मेरा खु दोन, रायपूर एक, अमोना एक, बुलडाणा शहरातील १४, मलकापूर तालुका वाघोळा दोन, झोडगा एक, वडजी एक, मलकापूर शहरातील तीन , संग्रामपूर शहरातील एक , शेगांव तालुका झाडेगांव एक, कन्हारखेड एक, आडसूळ तीन, शेगांव शहरातील आठ, सिं. राजा तालुका साखरखेर्डा एक, मोहाडी आदींचा समावेश आहे. तसेच बुलडाणा शहरातील १८ , बुलडाणा तालुका सागवण एक, खुपगांव एक, मोहखेड एक, मासरूळ एक,दुधा एक , चांडोळ एक, डोमरूळ एक, मोताळा तालुका आव्हा एक, टाकळी एक, टाकरखेड एक, माकोडी एक, नांदुरा तालुका निमगांव एक, वडनेर एक , नांदुरा शहरातील १० , दे. राजा शहर दोन, दे. राजा तालुका गारगुंडी चार, दे. मही एक, सावरगांव जहागीर एक, लोणार तालुका जांभूळ एक, लोणार शहर एक, मलकापूर शहर दोन, मलकापूर तालुका कुंड एक, खामगांव शहर दोन, चिखली तालुका खंडाळा एक, शिरपूर एक, दुधलगांव दोन, चिखली शहरातील तीन, मेहकर तालुका सावत्रा दोन, हिवरा गार्डी चार, जळगांव जामोद तालुका : वडशिंगी सात, पळशी घाट एक, मडाखेड एक, जळगांव जामोद शहर तीघांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत २६ हजार ४१९ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तसेच ४ हजार ७२६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या १ हजार १५० बाधीतांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.रामेश्वर पुरी यांनी दिली.
जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोना संसर्ग वाढत असल्याने जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, नागरिकांना गांभीर्य नसल्याचे चित्र असून अनेक जण मास्क न लावता फिरत असल्याने बुलडाणा शहरासह जिल्ह्यात संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.

Web Title: CoronaVirus in Buldhana: Another dies, 103 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.