Coronavirus in Buldhana :  १७७ पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 11:54 AM2020-09-13T11:54:01+5:302020-09-13T11:54:12+5:30

गेल्या तीन दिवसापासून दररोज एका बाधीचा मृत्यू होत असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.

Coronavirus in Buldhana: 177 positive, one dies | Coronavirus in Buldhana :  १७७ पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

Coronavirus in Buldhana :  १७७ पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात सातत्याने वाढत असून शनिवारी तब्बल १७७ जण बाधीत आढळून आले तर शेगाव येथील एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसापासून दररोज एका बाधीचा मृत्यू होत असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपीड टेस्ट तपासणी केलेल्या ६४४ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी ४६७ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर १७७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालापैकी १५५ तर रॅपीड टेस्टमध्ये २२ जण पॉझिटिव्ह आढळून आले. दुसरीकडे शेगाव येथे उपचारादरम्यान एका ७० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात झालेला हा तिसरा मृत्यू आहे. शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये खामगाव ४४, देऊळगाव राजा २५ गारखेड दोन, बुलडाणा सहा, नागझरी एक, धाड एक, मातला एक, करवंड एक, चिखली सात, आमखेड चार, टाकरखेड दोन, बानखेड एक, दे. घुबे तीन सोनेवाडी एक, सावरगाव डुकरे एक, शेलदू एक, मलकापूर आठ, दाताळा तीन, घिर्णी एक, मेहकर तीन, डोणगाव एक, रायगाव एक, बिबी एक, शिवणी पिसा एक, चिंचोली एक, नांदुरा चार, निमगाव तीन, वडनेर एक, तारखेड एक, जळगांव जामोद एक, खेर्डा आठ, जांभोरा एक, साखरखेर्डा एक, हिवरा गडलिंग दोन, राहेरी नऊ, बारलिंगा एक, बोराखेडी दोन, धामणगाव एक, लोणार एक, जलंब एक, माटरगाव पाच, शेगाव दहा, जळका तेली एक, पिंपळगाव राजा दोन, वर्णा एक, शेलोडी एक, सिंदखेड राजा एक, आणि अकोला येथील गौरक्षण वाडीमधील एकाचा यामध्ये समावेश आहे.


१७५ रुग्णांची कोरोनावर मात
शनिवारी १७५ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. यामध्ये मेंडगाव एक, सरंबा एक, शेगाव २४, नांदुरा सहा, खामगाव सात, चिखली ११, शेलूद एक, मलकापूर पांग्रा एक, दरेगाव ४, तांदुळवाडी दोन, आगेफळ एक, मोहाडी सवडत चार, बुलडाणा २५, वरवंड एक, जीगाव एक, नायगाव चार, धानोरा एक, मेहकर तीन, लाखनवाडा १२, माटरगाव एक, जानेफळ आठ, डोणगाव १७, जामगाव तीन, जळगाव जामोद सात, वाडीखुर्द तीन, देऊळगाव राजा २३, शिरढोण एक, लोणवडी एक, वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील एकाचा यात समावेश आहे. दरम्यान, आतापयंत २२, ७७१ संदिग्ध व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहे तर बाधीत रुग्णांपैकी ३,५३५ कोरोना बाधीत रुग्ण बरे झाले आहेत. अद्यापही १,४६८ संदिग्दांच्या अहवालाची प्रतीक्षा ्सून जिल्ह्यातील कोराना बाधीतांचा आकडा ४,७७४ वर पोहोचला आहे. सध्या रुग्णालयात १,१७६ व्यक्ती उपचार घेत असून ६३ कोरोना बाधीतांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

Web Title: Coronavirus in Buldhana: 177 positive, one dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.