शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ६ टक्क्यांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 11:18 AM

Coronavirus in Buldhana : सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ५.८९ टक्के असून रुग्ण दुपटीचा वेगही आता मंदावला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यात ९४ हजार २३५ संदिग्धांच्या तपासण्या करण्यात आल्या.संक्रमणाची व्याप्ती तुलनेने जिल्ह्यात घटत असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता पाहता आरोग्य विभागासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सध्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या नियोजनात गुंतलेली असताना बुलडाणा जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ५.८९ अर्थात सहा टक्क्यांवर आल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग सध्या जिल्ह्यात आटोक्यात येत असल्याचे एक सुखद चित्र आहे. मात्र त्याउपरही सतर्कही काळाची गरज बनली आहे.बुलडाणा जिल्ह्यात सध्या कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ११,५७० वर पोहोचली असून कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर मृत्युदर सध्या १.१९ असून, तो आटोक्यात आला असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यात ९४ हजार २३५ संदिग्धांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये आरटीपीसीआरच्या ६१ हजार ८७१, ट्रुनेटच्या ५,३१४ आणि रॅपिड टेस्ट २७ हजार ५० करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोना संदिग्धांच्या चाचण्यांची संख्या आता एक लाखाच्या टप्प्यात आली असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली होती. त्यातच ६ हजार शिक्षकांच्या तीन ते चार दिवसात चाचण्या पूर्ण करण्याचे उद्दिष्टही आरोग्य विभागाने पूर्ण केले होते. त्यावरून आरोग्य सचिवांनी बुलडाणा जिल्ह्यात प्रतिदिन २,८०० कोरोना चाचण्या करणेचे दिलेले निर्धातरि उद्दिष्ट  आरोग्य विभाग येत्या काळात पूर्ण करेल अशी आशा निर्माण झाली आहे.सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ५.८९ टक्के असून रुग्ण दुपटीचा वेगही आता मंदावला असून तो ८२ दिवसावर पोहोचला आहे. गेल्या महिन्यात हा वेग ७८.६ दिवस होता. हा वेगही आता मंदावला आहे. त्यामुळे कोरोना संक्रमणाची व्याप्ती तुलनेने जिल्ह्यात घटत असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे.जिल्ह्याचा मृत्यूदर सध्या १.१९ टक्के आहे. काेराेनामुळे बाधितांचा मृत्यू हाेण्याचे प्रमाणही गेल्या आठ ते दहा दिवसात कमी झाले आहे. दरम्यान  सुपर स्प्रेडरच्या चाचण्या करण्यासही जिल्हा प्रशासनाने वेग दिला आहे. प्राथमिक आराेग्य केंद्र स्तरावरून बसगाड्यांवरील चालक, वाहक यांचेसह भाजीपाला विक्रेते, व्यावसायिक यांच्या काेराेना चाचण्या करण्यासंदर्भात संबंधित यंत्रणा व संस्थांशी आराेग्य विभागाकडून पत्रव्यवहार झाला असून सुपरस्प्रेडरच्या चाचण्यांचाही वेग वाढला आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या