शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : मलकापूरात आणखी एक पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या १७१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 11:16 IST

बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या १७१ वर पोहोचली आहे तर पैकी ११ जणांचा मृत्यू झालेला आहे.

बुलडाणा: मलकापूर येथे आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला असून या रुग्णाचा २४ जून रोजी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या १७१ वर पोहोचली आहे तर पैकी ११ जणांचा मृत्यू झालेला आहे.अकोला येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी २८ अहवाल गुरूवारी प्राप्त झाले. यापैकी २७ अहवाल हे निगेटिव्ह आले तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह अहवाल हा मलकापूर येथील मंगलगेट परिसरातील ६७ वर्षीय महिलेचा असून ही महिला २४ जून रोजीच मृत्यू पावली होती. दरम्यान, या मृत महिलेच्या पार्थिवावर वैद्यकीय प्रोटोकॉल नुसार अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.दुसरीकडे आतापर्यंत जिल्ह्यात तपासणी करण्यात आलेल्या दोन हजार ३५३ व्यक्तींचे अहवाल हे निगेटीव्ह आले आहेत. त्याच प्रमाणे कोरोना बाधीतांपैकी उपचारानंतर बरे झालेल्यांची संख्या ही १३५ वर पोहोचली आहे.जिल्यात आज अखेरीस १७० रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यापैकी १३५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या जिल्ह् यात प्रत्यक्षात २५ अ‍ॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेस्वर पुरी यांनी दिली.दुसरीकडे गेल्या २५ दिवसात जिल्ह्यात आठ कोरोना बाधीतांचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये काहीसी घबराट आहे. जिल्ह्यातील एकूण बाधीत रुग्णांच्या टक्केवारीशी त्याची तुलना करता जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण हे सध्या सहा टक्क्यावर पोहोचले आहे. गेल्या नऊ दिवसात सात व्यक्तींचा मृत्यू झाला असून हे सर्व मलकापूर तालुक्यातील आहे.

११ जणांचा मृत्यूबुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना संसर्गाने ११ व्यक्तींचा मृत्यू झाला असून जून महिन्यात गेल्या २५ दिवसांमध्ये ७ रुग्ण दगावले आहेत. यात मलकापूर शहरातील सहा जणांचा समावेश आहे. मलकापूर शहर हे कारोना संर्गाच्या दृष्टीने सध्या हॉटस्पॉट बनलेले आहे. मधल्या काळात येथे मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत होते. मात्र गेल्या तीन ते चार दिवसासून हे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे.७९ टक्के रुग्ण झाले कोरोना मुक्तजिल्ह्यात कारोनामुक्त झालेल्या रुग्णांची टक्केवारी ही ७९ वर पोहोचली आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने ही दिलासा देणारी बाब म्हणावी लागले. मात्र अलिकडील काळात मृत्यू वाढल्यामुळे समस्या आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMalkapurमलकापूरbuldhanaबुलडाणा