CoronaVaccine : खामगावात कोविड लसीकरणाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 05:46 PM2021-01-16T17:46:24+5:302021-01-16T17:46:48+5:30

CoronaVaccine News खामगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालयात शनिवारी १०० जणांना कोविड-१९ लस देण्यात आली.

CoronaVaccine: Covid vaccination launched in Khamgaon | CoronaVaccine : खामगावात कोविड लसीकरणाचा शुभारंभ

CoronaVaccine : खामगावात कोविड लसीकरणाचा शुभारंभ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. त्याअनुषंगाने जिल्ह्यात सहा ठिकाणी लसीकरण करण्यात आले. यामध्ये खामगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालयात शनिवारी १०० जणांना कोविड-१९ लस देण्यात आली.
खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अ‍ॅड आकाश फुंडकर यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. शनिवारी प्राथमिक स्वरूपात १०० जणांना लस दिली.   रविवार आणि सोमवार या दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवार दि.१९ जानेवारीपासून पुन्हा लसीकरण करण्यात येईल. यामध्ये कोरोना योध्दांना लसीकरणासाठी प्राथमिकता दिली जाईल.  यावेळी  तहसीलदार शीतलकुमार रसाळ, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. एस.बी. वानखडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ राजेंद्र सांगळे, रुग्ण कल्याण समिती सदस्य संजय शिनगारे, राम मिश्रा, डॉ राहुल खंडारे, डॉ गुलाब पवार, डॉ राजाभाऊ क्षिरसागर, डॉ सुरेखा खर्चे, डॉ विलास चरखे, डॉ संजीत संत, डॉ ज्ञानेश्वर वायाळ, डॉ सुरेखा खडचे, डॉ दिनकर खिरोडकर,  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अभिलाष खंडारे, श्रीमती सुमित्राताई राऊत, विठ्ठल पवार, गणेश देशमुख,   मुख्य औषध अधिकारी श्रीधर जाधव, शिवदास वाघमोडे, लसीकरण विभागाचे हर्षल गायकवाड, सुमन म्हात्रे, श्रीमती श्रद्धा मोहनकार, शुभांगी तायडे, श्रीमती मुक्ता ढोके,  पूजा सिस्टर, जैन,  शेळके, भाजप चे विनोद टिकार आदी कोरोना योध्यांची उपस्थिती होती.

 
निवासी वैद्यकीय अधिकाºयांनी केली भीती दूर!
लसीबद्दल असलेल्या विविध शंका आणि भीती दूर करण्यासाठी खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांनी सर्वप्रथम लस घेतली. डॉ. टापरे यांना लस देण्यात आल्यानंतर आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, नर्स आणि आरोग्य सेवकांना लस देण्यात आली.

Web Title: CoronaVaccine: Covid vaccination launched in Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.