शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

CoronaVirus in Buldhana : तीन तालुक्यांचा पॉझिटिव्हीटी रेट २० टक्क्यांच्या वर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 12:08 PM

Corona Virus in Buldhana: जळगाव जामोद, शेगाव आणि बुलडाणा तालुक्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी रेट जिल्ह्यात सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना बाधितांची संख्या जिल्ह्यात सातत्याने वाढत असून जळगाव जामोद, शेगाव आणि बुलडाणा तालुक्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी रेट जिल्ह्यात सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. संग्रामपूर तालुक्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी असल्याने येथील पॉझिटिव्हीटी रेट कमी दिसतो. येथील चाचण्या वाढविल्यास वास्तविकता समोर येण्यास मदत होईल. फेब्रुवारी महिन्यात कोरोनाच्या चाचण्या जिल्ह्यात वाढल्या.  त्यावेळी जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा सरासरी १६ टक्के होता. तो महिनाअखेर १२ टक्क्यांवर आला असला तरी प्रामुख्याने जळगाव जामोदचा २५ टक्के आणि शेगावचा पॉझिटिव्हीटी रेट २३ टक्के तर बुलडाणा तालुक्याचा पॉझिटिव्हीटी रेट २० टक्के असल्याचे निदर्शनास आले आहे. हे तिन्ही तालुके कोरोनाचे हॉटस्पाॅट ठरत आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा विचार करता फेब्रुवारी महिन्यात ३८ हजार ६०७ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४,६६५ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. झाडेगावात १४ टक्के ग्रामस्थ पॉझिटिव्हजळगाव जामोद तालुक्यातील १४२८ लोकसंख्या असलेल्या झाडेगावातील तब्बल १४ टक्के ग्रामस्थ अर्थात १९७ जण आतार्पंत कोरोना बाधित आढळून आले आहे. २३ फेब्रुवारी रोजी येथे झालेल्या तपासणीत एकाच वेळी १५५ जण बाधित आढळून आले होते. त्यानंतर २३, एकदा ७ आणि एकदा ५ या प्रमाणे तपासणीत ग्रामस्थ बाधित आढळून आले आहे. एकूण लोकसंख्येच्या १४ टक्के नागरिक येथे बाधित आढळून आल्याने हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. जिल्हाधिकारी यांनीही येथील सविस्तर आढावा मधल्या काळात घेतला होता.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदShegaonशेगावbuldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या